#आंध्रप्रदेश

Special Report : शिर्डीचं साई संस्थान देणार शहिदांच्या कुटुंबियांना 2.5 कोटी

व्हिडिओFeb 17, 2019

Special Report : शिर्डीचं साई संस्थान देणार शहिदांच्या कुटुंबियांना 2.5 कोटी

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात म्हणून, इराणी करंडक विजेत्या विदर्भ संघानं बक्षीसाची संपूर्ण रक्कम शहीदांच्या परिवाराला दिलीय. शिर्डीच्या साई संस्थानानेही शहिदांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे काला आहे. साई संस्थानकडून शहिदांच्या कुटुंबियांना 2 कोटी 51 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी शहीदांच्या कुटुंबियांना अडीच कोटींची मदत दिलीय. तर आंध्रप्रदेश सरकारकडून शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत दिली जाणार आहे. क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनंसुद्धा शहीदांच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला असून, तो सर्व शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे. तर 'रिलायन्स फांऊडेशन'ने शहीदांच्या मुलांचं पालकत्व स्वीकारलं असून, सर्व शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि रोजगाराची जबाबदारी स्वीकारली आहे.

Live TV

News18 Lokmat
close