आंदोलन

Showing of 3719 - 3732 from 4180 results
बेकायदा प्रकल्पाला विरोध करणार्‍या गावकर्‍यांवर खंडणीचे गुन्हे दाखल

बातम्याNov 29, 2010

बेकायदा प्रकल्पाला विरोध करणार्‍या गावकर्‍यांवर खंडणीचे गुन्हे दाखल

29 नोव्हेंबरभीमाशंकर जंगल परिसरात इनरकॉन कंपनीच्या पवनउर्जा प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीची आयबीएन लोकमतनं बातमी दाखवली होती. पण आता प्रकल्पाला विरोध करणार्‍या शिंगेश्वर डोंगर परिसरातील कुडे गावातील ग्रामस्थांवरच खंडणीचे गुन्हे दाखल होत आहे. या मागे इनरकॉन कंपनीचा हात असल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला. दरम्यान ग्रामसभेत कंपनीच्या बेकायदा प्रकल्पाला विरोध करण्याचा ठरावही करण्यात आला. या प्रकल्पाला ग्रामपंचायत आणि वनरक्षक समितीची परवानगीच नाही. तरीही डोंगरावर वृक्षतोड सुरुच आहे. ब्लास्टिंगची परवानगी नसतानाही, मोठमोठ्या ब्लास्टींग यंत्रणा इथं काम करत आहे. या ब्लास्टचे आवाज आणि दगड परिसरातल्या वस्तीपर्यंत येतात. पण याकडे वनविभाग संपूर्ण दुर्लक्ष करतं आहे. त्यामुळे या भागात 'पश्चिम घाट बचाओ समिती' स्थापन करुन आंदोलन उभारलं जाणार आहे.