अॅट्रोसिटी Videos in Marathi

VIDEO : संविधान बदलण्याची इच्छा असल्याचा आरोप, पंकजा मुंंडेंनी पहिल्यांदाच दिलं उत्तर

बातम्याApr 17, 2019

VIDEO : संविधान बदलण्याची इच्छा असल्याचा आरोप, पंकजा मुंंडेंनी पहिल्यांदाच दिलं उत्तर

बीड, 17 एप्रिल : भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना संविधान बदलायचं आहे, असा आरोप करत विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या आरोपांना पंकजा मुंडे यांनी परळीतील सभेत उत्तर दिलं आहे. राज्यात कोणीही बोलायला तयार नव्हतं तेव्हा मी अ‍ॅट्रोसिटी कायद्याच्या बाजूने उभी होती, असं त्या म्हणाल्या. दरम्यान बीडमधील एका प्रचारसभेत बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, 'ही काही ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक नाही. ही लोकसभेची, संसदेची निवडणूक आहे. आपली घटना डॉ. आंबेडकरांनी लिहिली. तिथं जाऊन आपल्याला घटनेमध्ये काही बदल करायचे आहेत, काही नवी बिलं आणायची आहेत, तर किती समजणारा माणूस तिथं गेला पाहिजे. बीडमध्ये विकास करणाऱ्या डॉ. प्रीतम मुंडे यांना मताधिक्य द्या.'