अहमद पटेल

Showing of 144 - 147 from 147 results
मुख्यमंत्री निवडीचा निर्णय गुरुवारी होण्याची शक्यता

बातम्याDec 3, 2008

मुख्यमंत्री निवडीचा निर्णय गुरुवारी होण्याची शक्यता

3 डिसेंबरमुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राजीनामा देण्याची घोषणा करून दोन दिवस उलटले तरीही राज्यावरील अनिश्चिततेचं सावट अजूनही दूर होत नाहीये. विलासराव मुख्यमंत्रिपदी कायम राहणार की राज्याला नवे मुख्यमंत्री मिळणार ? या प्रश्नाला अजूनही उत्तर मिळालेलं नाही. दिल्लीत मगंळवारी सोनिया गांधींच्या घरी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. विलासरावांना काढलं तर मुख्यमंत्री कोणाला करायचं ? या प्रश्नावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एकमत होत नसल्याचं समजतंय. दहा जनपथमध्ये विलासराव दाखल झाले तेव्हा ते तणावाखाली आहेत, हे स्पष्ट जाणवत होतं. त्यांच्या पाठोपाठच त्यांचे मित्र अहमद पटेल, प्रभारी ए. के. अँटनी आणि संकटमोचक प्रणब मुखर्जीही सोनियांच्या घरात दाखल झाले. निर्णय घेणारी सगळी मंडळी एकत्र आली, म्हणून या बैठकीत विलासरावांबद्दलचा फैसला होईल अशी अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. "विलासरावांनी पुन्हा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. चर्चा सुरू आहे. निर्णय झाल्यावर आम्ही तुम्हाला सांगू" असं महाराष्ट्राचे प्रभारी ए. के. अँटनी यांनी सांगितलं.ताजमहाल हॉटेलची पाहणी करण्यासाठी दिग्दर्शक रामगोपाल वर्मा येणं हा केवळ एक योगायोग होता, असं मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी म्हटलंय. पण लोकांच्या भावनांचा आदर करत, झालेल्या घटनेबद्दल त्यांनी माफीही मागितलीय. आपली खुर्ची वाचावी, यासाठी विलासराव जोरदार प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे विलासरावांना काढलं तर मुख्यमंत्री कोणाला करायचं, या प्रश्नावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एकमत होत नसल्याचं सूत्रांकडून समजतंय. राष्ट्रवादीची पसंती असलेल्या सुशिलकुमार शिंद्यांना राज्यात पाठवण्यास पंतप्रधान उत्सुक नाहीत, तर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले अशोक चव्हाण राष्ट्रवादीला नको आहेत. सोनिया गांधी बुधवारी दिल्लीत नसल्याने मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय गुरूवारी होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading