Elec-widget

#अशोक चव्हाण

Showing of 1314 - 1327 from 1355 results
मराठा आरक्षणाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा

बातम्याJan 5, 2009

मराठा आरक्षणाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा

5 जानेवारी बीडमराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बीडमध्ये दिलं. त्याआधी मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूरमधल्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यकर्त्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी त्यानं हे कृत्य केलं असं सांगितलं गेलं. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीही पाठिंबा दिला आहे. तर शिवसनेनं मात्र आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.रविवारी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पंंढरपुरात होते यांचा हा पहिलाच मेळावा होता. या काँग्रेस मेळाव्यात कार्यकर्त्यांना उद्देशून मुख्यमंत्री भाषण करत असतानाच पळापळीला सुरुवात झाली. स्टेजजवळच्या गर्दीतून धूर येऊ लागला. स्टेजपासून अवघ्या 50 फूटांवर संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. मराठा समाजाचं आरक्षणाच्या मागणीसाठी त्याने हा आत्मदहनाचा प्रयत्न केला असं सांगितलं गेलं.या घटनेनंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सरकारच्या विचाराधीन असल्याचं पंढरपुरात सांगणा-या मुख्यमंत्र्यांनी काही तासातच आरक्षण देण्यास सरकार अनुकूल असल्याची घोषणा बीडमध्ये केली.आरक्षणाच्या आगीत काहींनी भाकरी भाजल्या तर काहींचे हात पोळले. नुकताच मुख्यमंत्री पदाचा काटेरी मुकुट घातलेले अशोक चव्हाण आणि तोंडावर आलेल्या निवडणुका पाहता आरक्षणाच्या राजकारणात कोण भाकरी भाजणार आणि कोणाचे हात पोळणार हे लवकरच कळेल.