#अरुण जेटली

Showing of 287 - 292 from 292 results
मोदींनी घेतली चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

बातम्याDec 26, 2012

मोदींनी घेतली चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

26 डिसेंबरनरेंद्र मोदी यांनी आज चौथ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गुजरातच्या राज्यपाल कमला बेनिवाल यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. अहमदाबादमधल्या सरदार पटेल स्टेडियमवर झालेल्या या शपथविधी सोहळ्यात मोदी यांच्यासोबत 17 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला देशातले विविध राजकीय नेते उपस्थित होते. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल हजर होते. तर लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेच्या विरोधी पक्षनेते अरुण जेटली, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि भाजपाअध्यक्ष नितीन गडकरीही हजर होते. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार या शपथविधी सोहळ्याला गैरहजर होते. शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेही हजर होते. याशिवाय आरपीआचे नेते रामदास आठवलेही या शपथविधी सोहळ्याला हजर होते.

Live TV

News18 Lokmat
close