#अभिनेता

Showing of 1925 - 1938 from 2047 results
मोहन जोशी राजीनामा देणार

बातम्याMay 4, 2011

मोहन जोशी राजीनामा देणार

04 मेअखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी उद्या नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत. आयबीएन-लोकमतच्या प्राईम टाईम बुलेटीनमध्ये आमचे संपादक निखिल वागळे यांच्याशी बोलताना त्यांनी आपण उद्या राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. नाशिक जवळ शुटिंगच्यावेळी दारु पिऊन धिंगाणा घातल्याने गावकर्‍यांनी जोशी आणि त्यांच्यासह असलेला अभिनेता चेतन दळवी यांना बेदम चोप दिला होता अशा बातम्या होत्या. पण आपल्याला अशा प्रकारची मारहाण झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पण दारु पिऊन धिंगाणा घातल्या प्रकरणी त्यांनी माफी मागितली आहे. जो प्रकार घडला तो ठीक नव्हता असही त्यांनी स्पष्ट केलं. आपण चूक केली आहे तर शिक्षा भोगायलाही आपण तयार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलंय. आणि पवारांनी राजीनामा मागितला तर देऊ असही ते म्हणाले होते. पण नाट्य परिषदेचे सदस्य त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम होते. अखेर मोहन जोशी यांनी आपण राजीनामा देत आहोत असं आयबीएन लोकमतच्या प्राईम टाईम बुलेटीनमध्ये जाहीर केलं.