Elec-widget

#अनंत हेगडे

कर्नाटकात प्रकाश राज यांच्या कार्यक्रमस्थळी भाजप कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडलं !

बातम्याJan 16, 2018

कर्नाटकात प्रकाश राज यांच्या कार्यक्रमस्थळी भाजप कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडलं !

कर्नाटकमध्ये भाजप आणि अभिनेता प्रकाश राज यांच्यातला वाद काही केल्या थांबत नाहीये. राघवेंद्र मठात प्रकाश राज हे भाषण करून गेल्यानंतर तिथल्या कार्यक्रम स्थळी भाजप कार्यकर्त्यांनी चक्क गोमूत्र शिंपडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. प्रकाश राज यांनी कन्नड वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीचे कात्रण ट्विट करत याबद्दलची माहिती दिली.