अध्यक्ष

Showing of 10011 - 10024 from 10155 results
राजू यांची सुनावणी 16 जानेवारीला

बातम्याJan 12, 2009

राजू यांची सुनावणी 16 जानेवारीला

12 जानेवारी, हैदराबादसत्यमचे माजी अध्यक्ष रामलिंग राजू याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता सोळा जानेवारीपर्यंत पुढं ढकलण्यात आलीय. पोलिसांनी पुढील तपासासाठी राजूंच्या पोलिस कस्टडीची मागणी केली होती तसंच सेबीनंही राजूंची चौकशी करण्याची परवानगी मागितली होती. या दोन्ही याचिकांवर आता सोळा तारखेलाच निर्णय घेतला जाईल. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजू आणि त्यांच्या भावानं कंपनीच्या ताळेबंदामध्ये अफरातफर केल्याचं मान्य केलंय. सत्यमचं टेकओव्हर होऊ नये म्हणून ताळेबंदात बदल केल्याचं हे दोघं भाऊ आता सांगत आहेत. पण मंदीमुळे आर्थिक स्थिती बिघडत गेली त्यामुळे सत्य लपवणं या दोघांना कठीण होत गेल्याची कबुली त्यांनी दिली,असं सूत्रांनी सांगितलं. सेबीच्या याचिकेच्या विरोधात याचिका दाखल करण्यासाठी रामलिंग राजूंना चार दिवसांची मुदत देण्यात आल्याची माहिती त्यांचे वकील भारत कुमार यांनी दिली आहे. त्यांच्या या याचिकेवरही सोळा तारखेलाच सुनावणी होईल. सेबीनं राजू न्यायालयीन कोठडीत असताना त्यांची जबानी घेण्याची मंजूरी मिळावी यासाठी याचिका दाखल केली आहे. पंचवीस तज्ज्ञ वकिलांची फळी राजूंच्या बचावासाठी उभी केली जाणार आहे असंही भारतकुमार यांनी सांगितलं.