अध्यक्ष

Showing of 9244 - 9257 from 10016 results
यंदाचा दमाणी साहित्य पुरस्कारांची घोषणा

बातम्याNov 23, 2010

यंदाचा दमाणी साहित्य पुरस्कारांची घोषणा

23 नोव्हेंबरमराठी साहित्यात प्रतिष्ठेचा मानला जाणा-या दमाणी पुरस्कारांची घोषणा झाली. गेल्या 22 वर्षांपासून मराठी साहित्य क्षेत्रात कसदार लेखन करणा-या साहित्यिकांना हा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या दमाणी साहित्य पुरस्कारासाठी ज्योत्स्ना कदम, प्रविण बांदेकर आणि संतोष शेणई यांची निवड झाली. ज्योत्स्ना कदम यांना 'सर आणि मी' या आत्मकथनासाठी, प्रविण बांदेकर यांना 'चाळेगत' या कादंबरीसाठी आणि संतोष शेणई यांना 'घटकापळाने' या काव्यसंग्रहासाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. रोख 25 हजार रूपये, शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि कवी रामदास फुटाणे यांनी या पुरस्कारांची पत्रकार परिषदेत घोषणा केली. या पुरस्काराचं वितरण सोलापूर इथं 16 डिसेंबर रोजी अ.भा.साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे आणि केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.