#अतिरेकी

Showing of 729 - 737 from 737 results
भारतीय क्रिकेट टीमचा पाक दौरा धोक्यात

बातम्याNov 11, 2008

भारतीय क्रिकेट टीमचा पाक दौरा धोक्यात

11 नोव्हेंबर सुरक्षेच्या कारणावरून भारतीय ज्युनिअर हॉकी टीमला पाकिस्तानचा दौरा करण्याची परवानगी नाकारल्यामुळे क्रिकेट वर्तुळातही घबराट पसरली. जोपर्यंत पाकिस्तानातल्या सुरक्षेच्या व्यवस्थेत सुधारणा होत नाही तो पर्यंत जानेवारीत होणारा भारताचा पाकिस्तान दौरा होऊ शकत नाही अशी माहिती आहे. बीसीसीआय देखील अशा परिस्थितीत भारतीय टीमला पाकिस्तानात पाठवायला तयार नाही.जानेवारी 2008पासून 400 हून अधिक अतिरेकी हल्ले... म्हणजे जवळ जवळ दिवसाला दोन बॉम्बस्फोट. ही आकडेवारी बगदादची नाही तर वस्तुस्थिती आहे पाकिस्तानातची .पाकिस्तानमधली ही आकडेवारी क्रिकेट जगाला आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या नजरेतूनही चुकलेली नाही. आणि त्यातच आता पेशावरमधल्या कय्यूम स्टेडियमबाहेर बॉम्बस्फोट झाला आहे. बीसीसीआयच्या वेबसाईटवरही जानेवारीत सुरू होणा-या दौ-याविषयीचं वेळापत्रक लावण्यात आलेलं नाही. पण मार्च महिन्यात होणा-या न्यूझीलंड दौ-याचं वेळापत्रक मात्र तिथे आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार ते परराष्ट्र विभागाच्या सल्ल्याची वाट बघत आहेत. ज्यामुळे त्यांना पीसीबीसमोर तोंडघशी पडाव लागणार नाही. पण त्यांची यावरची भूमिका अजूनही अस्पष्टच आहे. पाकिस्ताननं यावर्षी फार आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या नाहीत. वर्षाच्या सुरुवातीला महत्त्वाची मानली जाणारी चॅम्पियन्स ट्रॉफीही रद्द करण्यात आली. कारण इंग्लंड, साऊथ अफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी पाकिस्तानचा दौरा करायला नकार दिला होता. पण भारतानं माघार घेणं म्हणजे पाकिस्तानचा खेळ खल्लास झाल्यातच जमा आहे. असं असंल तरी पीसीबीनं दुबई स्पोर्ट्स सीटीशी पुढच्या 3 वर्षांसाठी करार केलाय. त्यानुसार पाकिस्तानातील वन डे आणि त्यांची टी - 20 क्रिकेट स्पर्धा तेथे खेळवण्यास येणार आहे. त्यामुळे जर हा पाकिस्तान दौरा रद्द झालाच तर तेथे वन डे सीरिज दुबईत खेळवण्याचा एक पर्याय पुढे येऊ शकतो.