#अतिरेकी

Showing of 703 - 716 from 721 results
मृतांचा आकडा 156 वर, जखमी 370

बातम्याNov 28, 2008

मृतांचा आकडा 156 वर, जखमी 370

28 नोव्हेंबर, मुंबई5.45 PMबुधवारी रात्री अतिरेक्यांनी मुंबईवर केलेल्या रक्तपाती हल्ल्यात आतापर्यंत 156 जणांना प्राण गमवावे लागले आहेत, तर 370 जण जखमी झाले आहेत. यात पोलिस दलातील 14 जण शहीद झाले असून , त्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे, एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख विजय साळसकर , अतिरिक्त आयुक्त आणि धाडसी अधिकारी अशोक कामटे तसच पीआय शशांक शिंदे यांचा समावेश आहे. याशिवाय ताजमध्ये झालेल्या कारवाईत मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना वीरमरण आलं आहे. मृतांचा एकूणआकडा 127 असून त्यात 14 पोलीस, 105 सामान्य नागरिक आणि 8 परदेशी नागरिक आहेत तर जखमींचा आकडा 327 वर गेला आहे. त्यात 24 पोलीस, 278 सामान्य नागरिक आणि 25 परदेशी नागरिक आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रूग्णालयात उपचार करण्यात येतायत. दरम्यान लष्कर आणि पोलिसांच्या कारवाईत आतापर्यंत पाच अतिरेकी ठार झाले असून, 9 अतिरेक्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान लष्कराच्या मदतीसाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डसचे 200 ब्लॅक कॅट मुंबईत तैनात करण्यात आले असून ताजमधील कारवाईत पाच अतिरेकी ठार झाले आहेत, तर 9 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.रात्री साडे नऊ वाजता अतिरेक्यांनी पहिला हल्ला केला तो नरिमन पॉईन्ट आणि कुलाबा इथं. एके-47 रायफल हातात घेऊन लिओपोल्ड कॅफेवर अंदाधुंद गोळीबार करत अतिरेक्यांनी हॅण्ड ग्रेनेडही फेकले. त्यानंतर ओबेरॉय आणि ताज हॉटेलमध्येही घुसत या अतिरेक्यांनी गोळीबार केला तसंच ऑबेरॉय हॉटेलमध्ये पर्यटकांना ओलीस ठेवलं. त्यानंतर रात्री दहा वाजता सीएसटी स्टेशनवर हल्ला करत तिथंही अंदाधुंद गोळीबार करत अतिरेक्यांनी हॅण्डग्रेनेड फेकले. एवढचं नाही तर अतिरेक्यांनी आपली मोडस ऑपरेंडी बदलत दिल्ली, अहमदाबादप्रमाणेच मोठ्या हॉस्पिटल्सनाही लक्ष्य केलं. कामा हॉस्पीटलमध्ये घुसून अतिरेक्यांनी गोळीबार केला.दक्षिण मुंबईत अतिरेक्यांनी असा धुडगूस घातलेला असतानाच विलेपार्ले आणि डॉकयार्ड इथं टॅक्सीत बॉम्बस्फोट झाले. ताज आणि ओबेरॉयमध्ये अजूनही अतिरेकी लपले असून त्यांनी पर्यटकांना ओलीस ठेवलं आहे. पोलिसांनी हा पूर्ण परिसर सील केला असून चकमक अजूनही चालू आहे. पोलिसांनी कुलाब्यात कर्फ्यू जारी केला आहे. उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनी हे दहशतवादी समुद्री मार्गाने आले होते अशी माहिती दिली. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी राज्यसरकारनं लष्कराची मदत घेतली आहे. तसंच दिल्लीहून राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवानही मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान डेक्कन मुजाहिद्दीन या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आयबीएन लोकमतला पाठवलेल्या ई-मेलमध्ये या संघटनेनं भारत सरकारला धडा शिकवण्यासाठी हे हल्ले केल्याचा दावा या मेलमध्ये केला आहे.