#अतिरेकी

Showing of 547 - 560 from 721 results
लाहोर स्फोटामागे जमाद-उद-दवा असल्याचा संशय

बातम्याMay 27, 2009

लाहोर स्फोटामागे जमाद-उद-दवा असल्याचा संशय

27 मे लाहोर आयएसआय ऑफिस आणि हायकोर्टाच्याजवळ आज झालेला शक्तीशाली बॉम्बस्फोट जमात-उद-दावाचा अतिरेकी हफिज सईदच्या सुटकेसाठी केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जमाद-उद-दवा ही संघटना लष्करे-ए-तय्यबाशी संलग्न असणारी आतिरेकी संघटना आहे. त्यामुळे बॉम्बस्फोटांमागे जमाद-उद-दवा ही संघटना असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हाफीजची सुनावणी आज पाकिस्तान उच्चन्यायालयात होणार होती. पाकिस्तानातली अतिरेकी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख हफिज सईद आहे. तो 26/11 च्या मुंबई हल्ल्यातला प्रमुख संशयित आहे. 26/11च्या हल्ल्यासंदर्भात भारताने पाककडे हफिजचा ताबा मागितला होता. सध्या हफिज पाकिस्तान सरकारच्या नजरकैदेत आहे. आज लाहोर हायकोर्टात हफिजच्या केसची सुनावणी होणार होती. तेव्हा नेमका हा घातपात झाला आहे.पांढर्‍या रंगाची टोयोटा कार इमारतीत घुसल्यावर स्फोट झाला असल्याची माहिती काही प्रत्यक्षदशीर्नी दिली आहे. आजच्या लाहोर बॉम्बस्फोटात 200 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथल्या इमारतींच्या ढिगार्‍याखालून जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. लाहोर आयएसएफ ऑफिस आणि हायकोर्टाच्या परिसरात असणार्‍या शाळांची आणि विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. पाकिस्तानमध्ये हाय अलर्टचा इशारा दिला असून दोन संशयितांना पकडण्यात आलं आहे. स्फोटातल्या इतर आरोपींना पकडण्यासाठी लाहोरमधल्या कोम्बिंग ऑपरेनने वेग पकडला आहे. ' लाहोर स्फोटाची चौकशी सुरू असून ,दहशतवाद्यांनी शरणागती पत्करावी, असं पाकिस्तानचे अतंर्गत सुरक्षामंत्री रेहमान मलिक यांनी म्हटलं आहे. ' स्वात प्रांतातल्या नामुष्कीनंतर दहशतवादी शहराकडे वळले असल्याचं रेहमान मलिक म्हणाले आहेत. तर पाकिस्तानचे अध्यक्ष आसीफ अली झरदारी यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.