#अजित पवार

Showing of 2133 - 2146 from 2251 results
औरंगाबादमध्ये सेना-भाजपकडून निदर्शन ; पोलीसांचा लाठीमार

बातम्याDec 28, 2010

औरंगाबादमध्ये सेना-भाजपकडून निदर्शन ; पोलीसांचा लाठीमार

28 डिसेंबरपुण्यातील लालमहालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने सिडको चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा जाळला. यावेळी कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांची आणि भाजप कार्यकर्त्यांची चांगलीच झटापट झाली. दादोजी कोंडदेव यांचा पुतळ्ा हटविल्यानंतर औरंगाबादेत संभाजी ब्रिगेड, शिवराज्य पक्षाकंडून आनंदोत्सव साजरा केला जातोय तर शिवसेना भाजपकडून या निर्णयाला विरोध होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सिडको चौकात निदर्शनाच्यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यावेळी पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणार्‍या कार्यकर्त्यांची पोलिसांची झटापट झाली. पोलिसांनी पुतळा हिसकावून ताब्यात घेतला. मात्र कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा दुसरा पुतळा आणून तो जाळण्यास सुरूवात केली. पुन्हा पोलिसांची झटापट झाली आणि कार्यकर्ते पोलिसांना भिडले.अखेर पुतळा जाळल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला आणि एकच पळापळ झाली. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुन्हा लालमहालात बसविण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.