अखिलेश यादव

Showing of 209 - 220 from 220 results
युपीच्या मुख्यमंत्रीपदी अखिलेश यादव

बातम्याMar 10, 2012

युपीच्या मुख्यमंत्रीपदी अखिलेश यादव

10 मार्चअखेर समाजवादी पार्टीच्या विजयाचे शिल्पकार अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. आज झालेल्या समाजावादी पार्टीच्या विधिमंडळ समितीच्या बैठकीत अखिलेश यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. अखिलेश यांच्या नावाला विरोध करणार्‍या आझम खान यांनीच अखिलेश याच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्वाव मांडला. आणि लगेच तो मंजूर करण्यात आला. 38 वर्षीय अखिलेश उत्तर प्रदेशचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते श्रीप्रकाश जैसवाल आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अखिलेश यादव यांना शुभेच्छा दिल्या आहेत.अखिलेश यादव...वय 38 वर्षं...उत्तर प्रदेशचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनण्यासाठी सज्ज झाले आहेत. हो नाही म्हणता म्हणात समाजवादी पक्षाच्या आमदारांनी त्यांची विधिमंधळ पक्षाचे नेते म्हणून एकमतानं निवड केली. सर्व काही ठरल्याप्रमाणंच घडलं. शुक्रवारी रात्री मुलायम सिंहांनी शिवपाल यादव आणि आझम खान या दोन ज्येष्ठ नेत्यांना बोलावलं. आणि या दोघांचाही अखिलेशच्या उमेदवारीला विरोध होता. म्हणून त्यांची समजूत काढण्यात आली. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अखिलेश यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून सुचवण्याची जबाबदारी आझम खान यांच्यावरच सोपवण्यात आली. शिवपाल यादवनी त्याला अनुमोदन दिलं.मुख्यमंत्री म्हणून अखिलेश यादव यांच्यासमोर अनेक आव्हानंही आहेत. मुख्य म्हणजे निकालानंतर आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झालेल्या हिंसाचाराला चाप लावण्याचे काम अखिलेशना करावं लागणार आहे. दुसरं म्हणजे पक्षाच्या जाहीरनाम्यात दिलेली सामाजिक आणि आर्थिक विकासाची आश्वासनं पूर्ण करून दाखवावी लागणार आहेत.आता 15 मार्चला.. उत्तर प्रदेशला सगळ्यांत तरुण मुख्यमंत्री मिळेल. आणि देशातल्या सगळ्यांत मोठ्या राज्यात एका नव्या आध्यायाला सुरुवात होईल. अखिलेश यादव यांची वयाच्या 38 व्या वर्षी या पदावर वर्णी लागेल असं दिसतंय. पाहुयात अशीच तरुण वयात कोणकोणत्या नेत्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली.प्रफुल्लकुमार महंतो आसाम (1985) 31 व्या वर्षी मुख्यमंत्री मधू कोडा झारखंड (2006)35 व्या वर्षी मुख्यमंत्रीए. के. अँटोनी केरळ (1977)37 व्या वर्षी मुख्यमंत्री शरद पवार महाराष्ट्र (1978)38 व्या वर्षी मुख्यमंत्रीओमर अब्दुल्ला जम्मू आणि काश्मीर (2009)39 व्या वर्षी मुख्यमंत्री मायावती उत्तरप्रदेश (1995)39 व्या वर्षी मुख्यमंत्री