कोल्हापूर, 13 ऑक्टोबर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालीय. नवरात्रोत्सवानिमित्त आंबाबाईच्या मंदिरावर करण्यात आलेल्या विविधरंगी रोषणाचीचं नयनरम्य दृश्य ड्रोन कॅमेरामधून शूट करण्यात आलंय. कोल्हापूरातील 'व्हॅम स्टुडिओ' यांच्या सौजन्याने मंदिराची ही डोळे दिपवणारी दृश्ये ड्रोन कॅमेरामधून शूट करण्यात आली आहेत. विविध रंगांची उधळण करत अंबाबाईचं मंदिर सजून गेलंय. त्यातच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे आकाशातून हे मंदिर अधिकच सुंदर दिसतंय.