2 फेब्रुवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँगे्रससोबत आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद झाले आहेत.येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करायची की नाही याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने बैठक बोलावली आहे. येत्या 11 एप्रिलला नवी मुंबई आणि औरंगाबाद या दोन महापालिका तसेच अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर या दोन नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये काँग्रेशी आघाडी करण्यावरून राष्ट्रवादीच्या काही महत्त्वाच्या नेत्यांमध्येच मतभेद झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच अखेर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: या विषयात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या 6 मार्चला मुंबईच्या राष्ट्रवादी भवनात शरद पवार स्वत: या बैठकीला हजर राहणार आहेत.