VIDEO: चिमुरड्या झिवाचा डान्स पाहून चाहते क्लीन बोल्ड; दिवाळीनिमित्त केली धम्माल
महेंद्र सिंह धोनीसारखाच (Mahendra Singh Dhoni) चिमुरड्या झिवालाही (Ziva) एवढ्या लहान वयात जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. झिवाचा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई, 16 नोव्हेंबर: कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा (M.S.Dhoni) जसा फॅनफॉलोईंग आहे तसेच फॅन्स त्याच्या छोट्या लेकीचेही आहेत. झिवा धोनी (Ziva Dhoni) अगदी लहान असल्यापासूनच तिचे फोटो आणि वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिच्या क्यूटनेसमुळे लहान वयातही तिचे अनेक चाहते आहेत. दिवाळीनिमित्त झिवाचा एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये ती पिवळ्या रंगाचा शरारा घालून डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत 4 लाखापेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे.
झिवाचं सोशल मीडिया अकाऊंट साक्षी धोनी आणि महेंद्रसिंह धोनी हाताळतात. ते दोघंही सोशल मीडियावर तिचे नव-नवे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात.
सोशल मीडियावर सध्या साक्षी आणि माहीचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते दोघं आणि त्यांचा मित्र परिवार एकत्र दिसत आहे. धोनीने त्याच्या मित्रांसोबत दिवाळी साजरी केली.
भारताचा माजी कप्तान महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्ट रोजी जागतिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यंदाच्या आयपीएलमध्ये मात्र माहीने चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचं नेतृत्व केलं होतं. पण सीएसकेचा (CSK)संघ यावर्षीच्या आयपीएलमध्ये विशेष कामगिरी करू शकला नाही.