VIDEO : झिवाने केला मुंबई इंडियन्सचा जयघोष, रोहित शर्माला हसू अनावर

VIDEO : झिवाने केला मुंबई इंडियन्सचा जयघोष, रोहित शर्माला हसू अनावर

चेन्नईच्या पराभवानंतर झिवाने चक्क मुंबई इंडियन्स,मुंबई इंडियन्स म्हणत चीअर अप केलं.

  • Share this:

मुबंई, 04 एप्रिल : भारताचा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आय़पीएलमध्ये चेन्नईचं नेतृत्व करतो. त्यामुळे धोनीचे चाहतेही चेन्नईला सपोर्ट करतात. धोनीप्रमाणे त्याची मुलगी झिवाच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. तिचे आणि धोनीचे अनेक व्हिडीओ आतापर्यंत व्हायरल झाले आहेत. नुकताच झिवाचा धोनीला चिअर करत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात झिवा सामन्याचा आनंद लुटत असलेली पाहायला मिळाली होती. आता तिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यात झिवा धोनीच्या नाही तर चक्क मुंबईच्या संघाला चिअर करताना दिसत आहे.

बुधवारी झालेल्या मुंबई विरुद्ध चेन्नईच्या सामन्यानंतरचा झिवाचा हा व्हिडीओ आहे. मुंबईविरुद्ध चेन्नईला 37 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर चेन्नईच्या चाहत्यांची निराशा झाली. मात्र, झिवाने चक्क मुंबई इंडियन्सचा जयघोष केला. बसमध्ये एका खुर्चित बसलेली झिवा मुंबई इंडियन्स, मुंबई इंडियन्स असं म्हणताना दिसत आहे. यावेळी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला त्याचे हसू आवरता आलं नाही.

चेन्नईचा यंदाच्या हंगामातील हा पहिलाच पराभव ठरला. यामुळे त्यांचे गुणतक्त्यातील स्थान दुसऱ्या क्रमांकावर घसरले तर किंग्ज इलेव्हन पंजाब पहिल्या स्थानी पोहचले. चेन्नईचा पुढचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे.

First published: April 4, 2019, 8:56 PM IST

ताज्या बातम्या