धोनी सीमेवर तर झिवा म्हणते,'देश का सिपाही हूं'; VIDEO होतोय व्हायरल

धोनी सीमेवर तर झिवा म्हणते,'देश का सिपाही हूं'; VIDEO होतोय व्हायरल

महेंद्रसिंग धोनीची कन्या झिवाने स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात झाशीच्या राणीची वेशभुषा केली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : देशभर उत्साहात 73 वा स्वांतंत्र्यदिन साजरा होत आहे. दरम्यान, भारताचा यष्टीरक्षक धोनीचे लष्कराच्या वर्दीतले फोटो व्हायरल होत आहेत. वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर धोनी लष्करात ट्रेनिंग घेत आहे. धोनीशिवाय त्याची मुलगी झिवाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. धोनी इतकीच झिवासुद्धा चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. झिवाने स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेत आयोजित कऱण्यात आलेल्या कार्यक्रमात केलेल्या परफॉर्मन्सची चर्चा होत आहे.

झिवाच्या शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सर्व मुलांनी वेगवेगळ्या वेशभुषा केल्या होत्या. झिवानं झाशीच्या राणीची वेशभुषा केली होती. हातात तलावर आणि ढाल घेऊन चिमुकली झिवा कार्यक्रमात सहभागी झाली होती. इतर मुलांमध्ये कोणी महात्मा गांधी झाले होते तर कोणी जवाहरलाल नेहरू झाले होते.

कार्यक्रमात नन्हा मुन्ना राही हूं, देश का सिपाही हूं या गाण्यावर मुलांनी सादरीकरण केलं. झाशीची राणी झालेल्या झिवाचा परफॉर्मन्स पाहून प्रत्येकजण कौतुक करत आहे.

धोनीचे लष्करी प्रशिक्षण 15 ऑगस्टला पुर्ण होणार आहे. विंडीज दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर धोनी निवृत्ती घेणार अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर बीसीसीआय़नेच धोनीची संघाला गरज असून त्याचे मार्गदर्शन संघाला लागणार आहे असं म्हटलं होतं.

दौंड : कुरकुंभ MIDC मध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 01:03 PM IST

ताज्या बातम्या