मुंबई, 12 जुलै : चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हा टेस्ट टीममधला भारताच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे, पण गेल्या काही दिवसांमध्ये पुजारावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. एवढच नाही तर त्याला टीममधून काढून टाकण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. याच कारणं आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (WTC Final) पुजाराने केलेली संथ खेळी. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर आता भारतीय टीम इंग्लंडमध्यें विश्रांती घेत आहे, पण तरीही चेतेश्वर पुजाराला ट्रोल करण्याची संधी क्रिकेट चाहते सोडताना दिसत नाहीयेत.
झिम्बाब्वेविरुद्धच्या टेस्टमध्ये बांगलादेशचा (Zimbabwe vs Bangladesh) 220 रनने विजय झाला. यानंतर झिम्बाब्वेच्या टाकूडझ्वानाशे कैटानो (Takudzwanashe Kaitano) याच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. सामन्याच्या अखेरच्या इनिंगमध्ये कैटानो याने तब्बल 102 बॉल खेळून फक्त 7 रन केले, यामध्ये एका फोरचा समावेश होता. कैटानो याने 6.86 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली, ज्यामुळे त्याची तुलना पुजाराशी केली गेली.
कैटानो याने पहिल्या इनिंगमध्येही अशीच संथ बॅटिंग केली. 311 बॉलमध्ये 87 रन करून तो आऊट झाला. कैटानो याने 27.97 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली, यात 9 फोरचा समावेश होता. पदार्पणाच्या टेस्टमध्ये दोन्ही इनिंग मिळून 400 बॉल खेळणारा कैटानो 12 वा खेळाडू बनला आहे.
पुजाराचा खराब फॉर्म
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या पहिल्या इनिंगमध्ये पुजाराला पहिली रन करायला 36 बॉल लागले. 54 बॉलमध्ये 8 रन करून पुजारा आऊट झाला, तर दुसऱ्या इनिंगमध्ये पुजाराला 80 बॉलमध्ये 15 रन करता आले. पुजाराने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये 18 मॅच खेळल्या, यात त्याला 28.03 च्या सरासरीने 841 रन करता आल्या, यात त्याला एकही शतक करता आलं नाही आणि त्याने 9 अर्धशतकं केली.
विराट कोहली (Virat Kohli) यानेही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर पुजारावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. प्रत्येक वेळी आऊट व्हायच्या चिंतेने खेळता येणार नाही, थोडा धोका पत्करावाच लागेल, असं कोहली म्हणाला. कोहलीच्या या वक्तव्यामुले पुजाराचं टीममधलं स्थान धोक्यात आल्याचं बोललं जात आहे.
इंग्लंडविरुद्धच्या आगामी टेस्ट सीरिजमध्येही विराट तिसऱ्या क्रमांकावर तर केएल राहुल (KL Rahul) चौथ्या क्रमांकावर खेळेल, ज्यामुळे पुजाराला बाहेर बसावं लागेल, असं बोललं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.