विराटच्या एक पाऊल पुढं, शिक्षणासाठी 3 वर्षे क्रिकेटपासून दूर राहिलेल्या खेळाडूची निवृत्ती

विराटच्या एक पाऊल पुढं, शिक्षणासाठी 3 वर्षे क्रिकेटपासून दूर राहिलेल्या खेळाडूची निवृत्ती

शिक्षण घेण्यासाठी त्यानं फॉर्ममध्ये असतानाही क्रिकेटमधून ब्रेक घेतला. या कर्णधारानं निवृत्ती घेतल्यानं सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

  • Share this:

हरारे, 04 सप्टेंबर : आयसीसीनं झिम्बॉब्वे क्रिकेट बोर्डावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यानंतर अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता आणखी एका खेळाडूनं निवृत्ती घेतली आहे. कर्णधार आणि दिग्गज फलंदाज असलेल्या हॅमिल्टनच्या निवृत्तीच्या निर्णयानं सर्वांनाच धक्का दिला आहे. त्यानं बांगलादेशविरुद्धच्या तिरंगी टी20 मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. झिम्बॉब्वे क्रिकेट बोर्डानं याची माहिती ट्विटरवरून दिली आहे.

देशाच्या क्रिकेट बोर्डाच्या कामकाजात सरकारकडून हस्तक्षेप वाढल्यानं आयसीसीनं झिम्बॉब्वे क्रिकेट बोर्डावर निलंबनाची कारवाई केली आहे.झिम्बॉब्वे क्रिकेट बोर्डाला निवडणुका घ्यायच्या नव्हत्या त्यावरूनही आयसीसीसोबत वाद होते. हॅमिल्टन झिम्बॉब्वेच्या दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक आहे. वयाच्या 18 व्या वर्षी क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या हॅमिल्टनने 18 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत.

हॅमिल्टन मसादजानं वयाच्या 18 व्या वर्षी कसोटी शतक झळकावलं होतं. त्यानं 2001 मध्ये विंडीजविरुद्ध 119 धावांची खेळी केली होती. कमी वयात शतक करणारा झिम्बॉब्वेचा पहिला तर जगातील चौथा फलंदाज ठरला होता. त्यानंतर मात्र हॅमिल्टनला कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही.

शिक्षणासाठी 3 वर्षांचा ब्रेक

शिक्षण पूर्ण करण्यासाठी हॅमिल्टनने क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्यानं युनिव्हर्सीटी ऑफ फ्री स्टेटमध्ये ग्रॅज्युएशन शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. झिम्बॉब्वे क्रिकेट बोर्डानं त्याला एका अटीवर शिक्षणासाठी परवानगी दिली होती. जेव्हा संघाला गरज पडेल तेव्हा यावं लागेल अशी अट घातली होती. तीन वर्षानंतर संघात परतला तेव्हा हॅमिल्टनचा फॉर्म गेला होता. त्यामुळं संघात स्थान पटकावता आलं नाही.

दुसऱ्या शतकासाठी लागली दहा वर्ष

2002 मध्ये अखेरची कसोटी खेळल्यानंतर हॅमिल्टनने तीन वर्षांनी संघात पुनरागमन केलं. त्यानं 2005 मध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळली. पण त्यात यश आलं नाही. पदार्पणात शतक केल्यानंतर दुसऱ्या शतकासाठी त्याला 10 वर्षांची वाट बघावी लागली होती. 2011 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्यानं 104 धावांची खेळी केली होती. हॅमिल्टनने 38 कसोटीत 2 हजार 223 धावा केल्या होत्या. यात 5 शतकं आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय 62 टी 20 सामने खेळताना हॅमिल्टनने 1 हजार 529 धावांची खेळी केली होती.

विराटच्या एक पाऊल पुढं

हॅमिल्टनने 209 एकदिवसीय सामन्यात 6 हजार 658 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 5 शतकं आणि 34 अर्धशतकं आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं नाबाद 178 धावांची खेळी केली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये असा विक्रम आहे ज्यात हॅमिल्टनने विराट कोहलीला मागे टाकलं आहे. पाच सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत हॅमिल्टन दुसऱ्या स्थानी आहे. तर विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. पाकच्या फखर जमानने 515 धावांसह पहिलं स्थान पटकावलं आहे. त्याच्यानंतर 467 धावांसह हॅमिल्टन दुसऱ्या स्थानी तर विराट कोहली 453 धावांवर खेळत आहे.

VIDEO: राज्यात पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Sep 4, 2019 11:46 AM IST

ताज्या बातम्या