झहिर खान आणि सागरिका लग्नाच्या बंधनात

झहिर खान आणि सागरिका लग्नाच्या बंधनात

भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज झहिर खान आणि चकदे गर्ल सागरिका यांचा लग्नसोहळा पार पडला.

  • Share this:

23 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज झहिर खान आणि चकदे गर्ल सागरिका यांचा लग्नसोहळा पार पडला. झहिर खान आणि सागरिकाच्या लग्नाचे फोटोज विद्या माळवदेनं ट्विट केलेत.

लग्नसमारंभात सागरिका खूप सुंदर दिसत होती. सव्यासाचीनं तिचा पूर्ण पोशाख डिझाइन केला होता. लाल साडी आणि त्यावर एम्ब्राॅयडरी असलेला ब्लाऊज यामुळे सागरिक एकदम खुलून दिसत होती. आणि तिच्यासोबत कुर्ता घातलेला राजबिंडा झहिर खान. सगळेच या जोडीचं कौतुक करण्यात दंग होते.

दरम्यान हा लग्नसोहळा अत्यंत जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळाच्या उपस्थितीत पार पडला. या जोडप्याच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन येत्या 27 तारखेला मुंबईत होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 23, 2017 02:52 PM IST

ताज्या बातम्या