25 एप्रिल : भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज आणि दिल्ली डेअरडेविल्स टीमचा कर्णधार झहीर खान वैयक्तिक आयुष्यात अखेर क्लीन बोल्ड झालाय. चक दे गर्ल सागरिका घाडगेने त्याची विकेट काढलीये. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा तर बरेच दिवस सुरू होती.
मात्र काल झहीरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी साखरपुडा केल्याची घोषणा केली. यानंतर या दोघांच्या ट्विटर पजेवर अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव झाला. भारतीय क्रिकेट टीमच्या आजी माजी सदस्यांनी झहीर आणि सागरिकाला त्यांच्या या नव्या इंनिगबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्यात.