IPL 2019: झहीर खानचे मुंबईकरांना चक्क मराठीतून आवाहन!

IPL 2019: झहीर खानचे मुंबईकरांना चक्क मराठीतून आवाहन!

२३ मार्चपासून होणार आयपीएलला सुरुवात होणार असून घरच्याच मैदानावर मुंबई हैद्राबादशी भिडणार आहे.

  • Share this:

मुंबई, 15 मार्च : एकीकडे निवडणुकीचे बिगूल वाजलं असताना, दुसरीकडे आयपीएलच्या रणसंग्रामालाही २३ मार्चपासून सुरुवात होत आहे. दरम्यान, पहिला सामना महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई आणि विराट कोहलीच्या बंगळुरू संघात होणार आहे. तर दुसरा सामना मुंबई इंडियन्सचा आणि हैदराबाद यांच्यात होणार आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला असून त्यातील मुंबईचे दोन सामने घरच्या मैदानावर आणि दोन सामने प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर आहेत. त्यातील घरच्या मैदानावर होणाऱ्या मुंबईच्या सामन्यांसाठी मुंबईकरांना चक्क मराठीतून भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा मुंबई इंडियन्सचा स्पोर्ट स्टाफ सहकारी झहीर खान याने आमंत्रण दिले आहे.

भारताचा जलद गोलंदाज म्हणून एकेकाळी फलंदाजांची दाणादाण उडविणाऱ्या झहीर खानने 92 एकदिवसीय सामन्यात 311 विकेट्स घेतल्या आहेत, तर 200 एकदिवसीय सामन्यात 282 विकेट्स घेतल्या. मात्र अखरे 2015 साली क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. बंगळुरूकडून आयपीएलला सुरुवात केल्यानंतर, 2009, 2010, 2014मध्ये झहीर मुंबई संघाकडून खेळात होता. मात्र, त्याचा जादू काही चालली नाही, म्हणून मुंबईने 2015-2016ला झहीरला नाकारलं आणि 2016ला दिल्ली संघाचा कर्णधार झाला. मात्र, दिल्ली संघाला काही विशेष कामगिरी करता आली नाही, आणि झहीरनं आयपीएलमधूनही निवृत्ती घेतली. सध्या झहीर मुंबई इंडियन्सचा स्पोर्ट स्टाफ सहकारी आहे.

VIDEO : एका बुक्कीत दात पाडेन, काँग्रेस आमदाराची पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी

First published: March 15, 2019, 6:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading