‘....तर मौलवी फतवा काढतील’, झहीर खानच्या दिवाळी फोटोवर ट्रोलर्सनी दिली धमकी

‘....तर मौलवी फतवा काढतील’, झहीर खानच्या दिवाळी फोटोवर ट्रोलर्सनी दिली धमकी

झहीर खान आणि सागरिका यांना त्या फोटोवरून चाहत्यांनी ट्रोल केले आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर : दिवाळी म्हटलं की सर्वांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि जल्लोष असतो. त्यासाठी महिनाभर वेगवेगळी तयारी केली जाते, काहींच्या घरी पुजाही केली जाते. दिवाळीचा उत्साह जेवढा सामान्यांमध्ये असतो, तसाच तो क्रिकेकपटू आणि सेलिब्रिटींमध्येही असतो. भारताचा माजी गोलंदाज झहीर खाननं आपली पत्नी सागरिकासोबत दिवाळीचा आनंद घेतला. झहीरनं सागरिकासोबत पूजा केली. मात्र हा फोटो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

सागरिकासोबतच्या या फोटोवर काही चाहत्यांनी धमकी दिली आहे. तर काही चाहत्यांनी जहीरचे समर्थन केले आहे. झहीर मुसलमान असून, तुला असं पूजा करणं शोभत नाही असे कमेंट काही चाहत्यांनी केले आहे. झहीरची पत्नी सागरिका अभिनेत्री असून ती मराठी आहे, त्यामुळं मराठमोळ्या पध्दतीत त्यांच्याकडे दिवाळी होत असावी, अशा कमेंटही या फोटोवर करण्यात आल्या आहेत.

दरम्यान या फोटोवर एका चाहत्यानं फोटो टाकू नको, मौलवी फतवा काढतील अशी धमकीही दिली आहे.

या फोटोमुळं काही कट्टर लोकांनी त्याल ट्रोल केले आहे. तर, काही चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.

रोहित शर्माही झाला ट्रोल

गेल्या काही वर्षांपासून बऱ्याच ठिकाणी पर्यावरणपूरक अशी दिवाळी साजरी केली जाते. मुंबईत यंदात दिवाळीत गेल्या पाच वर्षांनंतर शुध्द हवा पाहायला मिळाली. तर, दिल्लीमध्ये वायू प्रदुषणाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, त्यामुळं यंदाची दिवाळी ही पर्यावरणपूरक असावी, यासाठी खेळाडूंनीही पुढाकार घेतला आहे. दरम्यान, भारताचा सलामीचा फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माने देखील दिवाळीच्या शुभेच्छा दे, फटाके फोडू नका, असा सल्ला चाहत्यांना दिला आहे. मात्र रोहितच्या या सल्ल्याला चाहत्यांनी ट्रोल केले आहे.

या पोस्टवर चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही चाहत्यांनी आयपीएलमध्ये वाजणाऱ्या फटाक्यांचा व्हिडीओ पोस्ट करत, मग आयपीएल कधी सोडतोयस असा सवाल केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 28, 2019 05:52 PM IST

ताज्या बातम्या