Home /News /sport /

'तो बताओ किसका विकेट लूं भैया', वनडे मॅचपूर्वी Yuzvendra Chahal चा विराटला भावुक सवाल

'तो बताओ किसका विकेट लूं भैया', वनडे मॅचपूर्वी Yuzvendra Chahal चा विराटला भावुक सवाल

Yuzvendra Chahal

Yuzvendra Chahal

भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान (India vs South Africa) तीन सामन्यांची वन डे सीरिजला आजपासून सुरुवात होणार आहे. 2018 मध्ये विराट कोहलीच्या(Virat Kohli) नेतृत्वाखाली भारताने सहा सामन्यांची एकदिवसीय मालिका 5-1 अशी जिंकली होती

    नवी दिल्ली, 19 जानेवारी: भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान (India vs South Africa) तीन सामन्यांची वन डे सीरिजला आजपासून सुरुवात होणार आहे. 2018 मध्ये विराट कोहलीच्या(Virat Kohli) नेतृत्वाखाली भारताने सहा सामन्यांची एकदिवसीय मालिका 5-1 अशी जिंकली होती. आता भारताची नजर आफ्रिकेच्या भूमीवर सलग दुसरी एकदिवसीय मालिका जिंकण्यावर आहे. अशातच फिरकीपटू युजवेंद्र चहलचे(Yuzvendra Chahal ) एक ट्विट सध्या चर्चेत आले आहे. विराटच्या टेस्ट टीमच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच चहलने त्याच्यासंदर्भात ट्विट केले आहे. भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी आपल्या सोशल अकाऊंटवर भावुक पोस्ट लिहीत विराटने भारतीय टेस्ट टीमचे कर्णधार पद सोडत असल्याची माहिती दिली. विराटच्या या निर्णयानंतर सर्व स्तरातून संमिश्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. दरम्यान आता चहलनेही एक भावुक मेसेज करत एक मजेशीर सवाल उपस्थित केला आहे. 'तो बताओ किसका विकेट लु भैया, असा प्रश्न करत चहलने, एकमेकांना समजून घेण्यापासून ते एकमेकांवर विश्वास ठेवण्यापर्यंतचा प्रवास निश्चितच माझ्या कायम लक्षात राहील. त्याच हेतूने आणि सर्वोत्तम कामगिरीसह आणखी बरेच गेम जिंकण्यासाठी. तुमच्या 7 वर्षांच्या यशस्वी कर्णधारपदाबद्दल अभिनंदन.' अशा आशयाचे ट्विट चहलने विराटसाठी केले आहे. युझवेंद्र चहलने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी अनेक शानदार कामगिरी केली. युझवेंद्र चहल आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळणार आहे. पहिल्या वनडेसाठी संभाव्य भारतीय संघ- केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, रिषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Virat kohli, Yuzvendra Chahal

    पुढील बातम्या