मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Team India च्या नव्या जर्सीत डान्स करताना दिसली 'मिसेस चहल'; VIDEO व्हायरल

Team India च्या नव्या जर्सीत डान्स करताना दिसली 'मिसेस चहल'; VIDEO व्हायरल

Team India च्या नव्या जर्सीत डान्स करताना दिसली मिसेस चहल; व्हिडीओ व्हायरल

Team India च्या नव्या जर्सीत डान्स करताना दिसली मिसेस चहल; व्हिडीओ व्हायरल

टी 20 वर्ल्ड कपमुळे (ICC Men's T20 World Cup 2021)देशात क्रिकेट फिव्हर सुरू असताना लेग स्पिनर युजवेंद्र चहलची (yuzvendra chahal)पत्नी धनश्रीने टीम इंडियाच्या नवीन जर्सीतील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  मुंबई, 22 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेट संघाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा(Dhanashree Verma) नेहमीच आपल्या डान्समुळे चर्चेत असते. नुकतंच तिने एक नवा व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये ती युएईत सुरु झालेल्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी (ICC Men's T20 World Cup 2021) टीम इंडियाला पाठिंबा दर्शवताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी, पती युजवेंद्र चहलला टी20 वर्ल्ड कप संघातून वगळल्याने धनश्रीने नाराजी व्यक्त केली होती. टी 20 वर्ल्ड कपमुळे देशात क्रिकेट फिव्हर सुरू असताना धनश्रीने टीम इंडियाच्या नवीन जर्सीतील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. धनश्रीने हा व्हिडिओ पोस्ट करताना 'मी माझ्या डान्सद्वारे टी 20 वर्ल्ड कपचा हंगाम सुरू होताच माझा खेळ दाखवत आहे. तुम्ही टीम इंडियाला कसं चीअर करत आहात? असा सवाल कॅप्शनमध्ये केला आहे.

  चहलला टी20 वर्ल्ड कप संघातून वगळल्याने नाराज दिसलेली धनश्री

  युएईमध्ये आयोजित आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात चहलने चमकदार कामगिरी केली. यानंतर निवडकर्ते चहलला संधी देऊ शकतील अशी अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही. चहलला विश्वचषक संघात संधी मिळाली नाही, तेव्हा धनश्रीने एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. 'आई म्हणते ... की ही वेळही निघून जाईल. डोके उंच करून जगा, कारण कौशल्य आणि चांगली कृत्ये नेहमीच सोबत असतात. तर गोष्टी अशा असतात की ही वेळ देखील निघून जाईल देव महान आहे.' अशा आशयाची पोस्ट तिने आपल्या इंन्स्टा स्टोरीली शेअर केली होती.

  म्हणूच चहलला संघातून वगळले

  काहीदिवसांपूर्वी, विराट कोहलीने चहलला वगळण्याचे आणि राहुल चाहरला संघात समाविष्ट करण्याचे कारण दिले. विराट कोहली म्हणाला, 'युझवेंद्र चहलला वगळणे हा एक कठीण निर्णय होता. पण, राहुल चाहरने गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. यूएईमधील खेळपट्टीवरचा त्याच खेळ पाहसा राहुल चाहरची निवड करण्यात आली आहे. जो वेगवान चेंडू फिरवतो तो फलंदाजांना अधिक अडचणीत आणतो. चाहर वेगवान गोलंदाजीसह स्टंपवर अॅटकदेखील करतो. त्याला तिथे चांगल्य विकेट्स मिळतात. त्याची हीच खेळी संघवनिवडीवेळी सर्वांना भावली. असे मत विराटने यावेळी व्यक्त केले.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: T20 cricket, T20 league, T20 world cup, Team india, Yuzvendra Chahal

  पुढील बातम्या