Home /News /sport /

‘या’ खास कारणासाठी युजवेंद्र चहल विश्वनाथ आनंद विरुद्ध खेळणार चेसचा सामना

‘या’ खास कारणासाठी युजवेंद्र चहल विश्वनाथ आनंद विरुद्ध खेळणार चेसचा सामना

टीम इंडियाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand) याच्याबरोबर चेसचा सामना खेळणार आहे.

    मुंबई, 13 जून: टीम इंडियाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)  क्रिकेटसोबतच आता चेस देखील खेळणार आहे. चहल पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand) याच्याबरोबर चेसचा सामना खेळणार आहे. चहलबरोबरच अभिनेता आमिर खान आणि अनेक प्रसिद्ध व्यक्ती आनंदला चेसमध्ये चॅलेंज देणार आहेत. कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) विरुद्ध सुरू असलेल्या लढाईत पैसे गोळा करण्यासाठी या सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे. युजवेंद्र चहल क्रिकेटच्यापूर्वी चेस खेळत असे. तो भारताकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील खेळला आहे. त्याने चेसच्या ऐवजी क्रिकेटमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. विश्वनाथ आनंदविरुद्ध एक तास होणाऱ्या या मॅचमध्ये चहलसह चित्रपट आणि उद्योग विश्वातील प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होणार आहेत. आमिर खान, रितेश देशमुख, अनन्या बिर्ला, अरजीत सिंह हे सर्व जण या मॅचमध्ये आनंदला आव्हान देतील. रविवारी संध्याकाळी पाच वाजता हा महामुकाबला सुरू होणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी चहलची निवड युजवेंद्र चहलची श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तीन वन-डे आणि तीन टी 20 सामने खेळणार आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या 5 टी20 मॅचच्या मालिकेत चहलनं निराशा केली होती. त्यामुळे शेवटच्या दोन मॅचमध्ये त्याच्या जागी राहुल चहरला संधी देण्यात आली होती. सध्या फॉर्मात नसलेल्या चहलसाठी श्रीलंका दौरा महत्त्वाचा आहे. टीम इंडियात निवड न झाल्यानं अनुभवी खेळाडू निराश, सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया : शिखर धवन (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार (व्हाईस कॅप्टन), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितिश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया नेट बॉलर्स : इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंह, साई किशोर आणि समरजीत सिंह
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aamir khan, Covid-19, Yuzvendra Chahal

    पुढील बातम्या