...आणि चहलने उगारला मुलीवर हात, पाहा हा VIRAL VIDEO

...आणि चहलने उगारला मुलीवर हात, पाहा हा VIRAL VIDEO

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल टिककॉकवरील (TikTok) एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मार्च : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो. आता मात्र चहल टिककॉकवरील (TikTok) एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. चहल सध्या ब्रिटिश मॉडेल आणि गायक रमीत संधूसोबत व्हिडीओ तयार करत आहे. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चहल रमित संधूवर हात उगारत असल्याचे दिसत आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चहल आणि रमित संधू रस्त्यावर फिरत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर चहल आपल्या शूजचे लेस बांधण्यासाठी खाली बसतो तेव्हाच रमित त्याच्यामागे लपतो. जेव्हा चहलला रामित दिसत नाही तेव्हा तो घाबरून जातो. तितक्यातच रमित चहलच्या मागून येऊन त्याला घाबरवते. यावर चहल रमितवर प्रेमाने मारण्यासाठी हात उगारतो. टीकटॉवरचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

वाचा-NUDE होऊन पळतोय आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू, VIDEO पाहूनच कळेल कारण

@yuzvendrachahalWhen you have an annoying but a cute friend##stargazing @rameetsandhuu @tiktok_india @tiktok♬ original sound - Yuzvendra Chahal

वाचा-VIDEO : बेन स्टोक्सच्या तोंडावर पत्नीनं मारलं पाणी, पाहा पुढे काय झालं

युजवेंद्र चहलने 19 मार्च रोजी हा व्हिडीओ अपलोड केला होता. आतापर्यंत हा व्हिडीओ 4 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. दरम्यान कोरोनामुळे भारत-दक्षिण आफ्रिका दौरा रद्द झाला. त्यामुळं भारतीय संघाचे खेळाडू सध्या आपल्या घरी विश्रांती घेत आहेत.

वाचा-क्रिकेटपटू स्वप्नात पत्नीला देतो शिव्या, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

दुसरीकडे कोरोनाव्हायरसमुळे आयपीएलचा 29 मार्चपासून सुरू झालेला हंगाम पुढे ढकलण्यात आला. मात्र अजूनही आयपीएलवर प्रश्नचिन्ह कायम आहे.

त्यामुळं क्रिकेट चाहत्यांना आपल्या खेळाडूंना कधी खेळताना पाहायला मिळेल, हे सांगणे कठिण आहे.

First published: March 20, 2020, 1:26 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading