• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • कमाई कोट्यवधींची पण मदत फक्त एवढीच; सोशल मीडियावर चहल ट्रोल

कमाई कोट्यवधींची पण मदत फक्त एवढीच; सोशल मीडियावर चहल ट्रोल

कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी पुढाकार घेतला आहे. या आवाहनाला टीम इंडियाचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलनेही (Yuzvendra Chahal) प्रतिसाद दिला, पण चहलने दिलेल्या रकमेमुळे त्याला ट्रोल करण्यात येत आहे.

 • Share this:
  मुंबई, 9 मे : कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या संकटात आर्थिक मदत म्हणून या दोघांनी 7 कोटी रुपये जमा करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. ही रक्कम एसीटी ग्रांट्सला (ACT Grants) दान करण्यात येणार आहे. यासाठी विराट आणि अनुष्काने त्यांच्या चाहत्यांना मदत करण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला टीम इंडियाचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलनेही (Yuzvendra Chahal) प्रतिसाद दिला, पण चहलने दिलेल्या रकमेमुळे त्याला ट्रोल करण्यात येत आहे. एसीटी ग्रांट्स ऑक्सिजन आणि उपचारांशी जोडल्या गेलेल्या सुविधा उपलब्ध करून द्यायचं काम करते. विराट आणि अनुष्काने सात दिवसांच्या या मोहिमेत 7 कोटी रुपये जमवण्याचं लक्ष्य ठेवलं होतं, पण पहिल्या 24 तासांमध्येच त्यांना 3.6 कोटी रुपये जमा करण्यात यश आलं. विराट कोहलीने ट्वीट करून याबाबत माहिती दिली. 24 तासांपेक्षा कमी वेळात 3.6 कोटी रुपये, खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी संघर्ष करा आणि देशाची मदत करा, धन्यवाद, असं विराट त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला. युझवेंद्र चहलने विरुष्काच्या उपक्रमाला 95 हजार रुपयांची देणगी दिली, पण यावरून त्याला ट्रोल करण्यात येत आहे. क्रिकेटपटू म्हणून तू कोट्यवधींची कमाई करतोस, पण मदत मात्र एवढी कमी देतोस, असं चहलला ऐकवण्यात येत आहे. yuzvendra chahal ipl yuzvendra chahal 'चहलने खरंच 95 हजार रुपये दान केले?' असा सवाल एकाने विचारला. तर किती दान द्यायचं ही त्याची इच्छा असेल, पण आपल्या कमाईपैकी आपण किती रक्कम दान केली, हे पाहून त्यालाही लाज वाटेल, असं सारांश नावाचा यूजर म्हणाला. कोट्यवधी रुपये कमावतो, पण दान फक्त 95 हजारांचं करतो, अशी टीका युवराज अस्थानाने केली. एकूण कमाई 30 कोटी रुपये, आयपीएलमधून 6 कोटी रुपये आणि मदत फक्त 95 हजारांची? भावा तुझ्या आयफोनची किंमत मदतीपेक्षा जास्त आहे, असं दिक्षा नारंग हिने चहलला सुनावलं.
  Published by:Shreyas
  First published: