युझवेंद्र चहलनं तरुणीचं गाणं ऐकून काढला पळ, पाहा VIDEO

युझवेंद्र चहलनं तरुणीचं गाणं ऐकून काढला पळ, पाहा VIDEO

युजवेंद्र चहलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात तरुणीचे गाणं ऐकून चहल वैतागल्याचं दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 03 मार्च : सोशल मीडियावर युजवेंद्र चहलचा व्हिडीओ चांगलाचा व्हायरल झाला आहे. चहल तसा टिकटॉकवर अॅक्टिव्ह असतो. चहलचा नवा TikTok व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालतो आहे. चहलने ब्रिटीश मॉडल आणि गायक रमीत संधूसोबत एक टिकटॉक मजेदार व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओमध्ये रमीत रोमॉंटिक अंदाजात पाहायला मिळते आहे.

या व्हिडीओमध्ये रमीत चहलसाठी तिच्या खास रोमॉंटिक अंदाजात गाणं म्हणते आहे. रमीत युजवेंद्र चहलच्या जवळ येऊन गाणं म्हणते. 'सिंह इज किंग' चित्रपटातलं 'तेरी ओर...' हे गाणं रमीत म्हणते आणि मग काय तिचा आवाज ऐकून चहल चक्क तिथून पळ काढतो. दोघांचा हा मजेदार व्हिडीओ चहलने शेअर केला आहे. ‘ये क्रेजी है…’ असं कॅप्शन दिलं आहे. टिकटॉकच्या या व्हिडीओला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. 12.4 मिलीयन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

@yuzvendrachahalLol 😂 she’s crazy ##foryoupage ##tiktok ##tiktokindia @rameetsandhuu

♬ original sound - Nishi Singh

चहलने याआधी रमीतसोबतचा आणखी एक व्हिडीओ वायरल झाला होता. ज्यामध्ये रमीत लांब पळताना दिसते आहे. या व्हिडिओला देखिल 40 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिल आहे.याआधीही ब्रिटिश मॉडेल आणि गायिका रमीत संधू (Rameet Sandhu) सोबत असाच एक मजेदार व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडीओ त्याच्या फॅन्सना प्रचंड आवडला होता. खूप लाईक्स आणि शेअर्स या फोटोला मिळाले होते. युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) च्या डान्स मुव्ह्सचे अनेक फॅन्स आहेत.त्यामुळे त्याने पोस्ट केलेले अनेक व्हिडीओ सर्रास व्हायरल होतात. चहलनं पोस्ट केलेला आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चहलने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला होता.

इतर बातम्या: दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून विराट बाहेर? रोहित ऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपद

लाजीरवाण्या पराभवानंतर विराट भडकला! प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारला उलट प्रश्न

First published: March 2, 2020, 9:37 PM IST

ताज्या बातम्या