मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'...तर मी आणि कुलदीप पुन्हा एकत्र खेळू', चहलने घेतलं जडेजाचं नाव

'...तर मी आणि कुलदीप पुन्हा एकत्र खेळू', चहलने घेतलं जडेजाचं नाव

टीम इंडियाची (Team India) स्पिनर जोडी युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये धमाकेदार सुरुवात केली, पण गेल्या काही काळात त्यांना संघर्ष करावा लागत आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 21 मे: टीम इंडियाची (Team India) स्पिनर जोडी युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये धमाकेदार सुरुवात केली, पण गेल्या काही काळात त्यांना संघर्ष करावा लागत आहे. कुलदीप यादव तर टीम इंडियाच्या बाहेर झाला आहे. 2017 साली खराब फॉर्ममुळे रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) टीमबाहेर करण्यात आलं, पण यानंतर एकाच वर्षात जडेजाचं टीममध्ये पुनरागमन झालं. जडेजाने जोरदार पुनरागमन केल्यामुळे कुलदीप आणि चहल यांच्यापैकी एकालाच टीममध्ये संधी मिळाली. यानंतर आता चहलने मी आणि कुलदीप पुन्हा एकदा एकत्र खेळू शकतो, पण यासाठी रविंद्र जडेजाला मध्यमगती बॉलर झालं पाहिजे, असं वक्तव्य केलं.

मी आणि कुलदीप जेव्हा एकत्र खेळायचो तेव्हा हार्दिक पांड्याही बॉलिंग करायचा, असं चहल स्पोर्ट्स तकशी बोलताना म्हणाला.

'हार्दिकही टीममध्ये होता आणि तो बॉलिंगही करत होता. 2018 साली हार्दिकला दुखापत झाली, यानंतर जडेजाचं टीममध्ये पुनरागमन झालं. तो ऑलराऊंडर आहे आणि सातव्या क्रमांकावर बॅटिंग करू शकतो, पण तो स्पिनर आहे, हे दूर्भाग्य आहे. त्यामुळे कुलदीप आणि चहलला एकत्र खेळायचं असेल, तर जडेजाला मध्यमगती बॉलर व्हावं लागेल,' अशी प्रतिक्रिया चहलने दिली.

'कुलदीप आणि मी प्रत्येक सीरिजमध्ये 50-50 टक्के मॅच खेळतो. कधी त्याला 5 पैकी 3 मॅच मिळतात, कधी मला. टीम कॉम्बिनेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. 11 खेळाडूंची टीम बनते, त्यामुळे कुलदीप-चहल टीममध्ये एकत्र फिट होत नाहीत. टीमला अशा ऑलराऊंडरची गरज आहे, जो सातव्या क्रमांकावर बॅटिंग करू शकेल. मला संधी मिळेल किंवा नाही, पण टीम जिंकली तर मला आनंद आहे,' असं वक्तव्य चहलने केलं.

2017 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कुलदीप आणि चहलवर भारताच्या स्पिन बॉलिंगची जबाबदारी आली. या दोघांनीही अनेक सीरिजमध्ये उत्कृष्ट बॉलिंग करत भारताला विजय मिळवून दिले. सध्या चहल श्रीलंका दौऱ्यासाठी तयारी करत आहे.

कुलदीप यादवने त्याच्या करियरमध्ये 7 टेस्ट, 63 वनडे आणि 21 टी-20 मॅच खेळल्या. त्याच्या नावावर टेस्टमध्ये 26, वनडेमध्ये 105 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मध्ये 39 विकेट आहेत. तर चहलला अजून टेस्ट क्रिकेटमध्ये संधी मिळालेली नाही. चहलने 54 वनडेमध्ये 92 आणि 48 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 62 विकेट घेतल्या.

First published:

Tags: Cricket, Kuldeep yadav, Ravindra jadeja, Team india, Yuzvendra Chahal