चहल म्हणतो, मला क्रॉप का केलंस? रोहित शर्माच्या पत्नीनं दिलं 'हे' उत्तर

भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने विचारलेल्या प्रश्नावर रोहित शर्माची बायको रितिकानं मजेशीर उत्तर दिलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2019 11:54 AM IST

चहल म्हणतो, मला क्रॉप का केलंस? रोहित शर्माच्या पत्नीनं दिलं 'हे' उत्तर

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : भारताचा गोलंदाज युझवेंद्र चहल त्याच्या चहल टीव्ही चॅनलमुळे नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये त्याचा समावेश आहे. चहल टीव्हीवरून तो संघ सहकाऱ्यांची फिरकीही घेत असतो. आताही त्यानं विचारलेल्या एका प्रश्नाची चर्चा सुरू आहे. रोहित शर्माची पत्नी रितिकाने टाकलेल्या पोस्टवर युझवेंद्र चहलने प्रश्न विचारला आहे.

रितिकाने सोशल मीडियावर रोहित आणि मुलगीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोतून युझवेंद्र चहलला क्रॉप केलं आहे. याचं कारण चहलने रितिकाला विचारलं. यावर तिने मजेशीर उत्तर दिलं. रितिकाने शेअर केलेल्या फोटोला 'Reunited' असं कॅप्शन दिलं आहे. यावर युझवेंद्रनं कमेंट करून विचारलं की, मला क्रॉप का केलंत?

चहलच्या प्रश्नावर रितिकाने म्हटलं की, फोटोत तुझाच कूलनेस जास्त दिसत होता. रितिकाच्या या उत्तरानंतर चाहत्यांनीही यामध्ये भाग घेत मजेशीर कमेंट केल्या आहेत. काही चाहत्यांनी तर तु कशाला दोघांत तिसरा जातोयस असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

Reunited ❤️

A post shared by Ritika Sajdeh (@ritssajdeh) on

Loading...

सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेमध्ये व्यस्त आहे. रोहित शर्मा टी20 आणि कसोटी संघातही आहे. तर चहलला विश्रांती देण्यात आली आहे. वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माचा फॉ़र्म बिघडला आहे. विंडीज दौऱ्यात त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.

वाचा : पंतला मार्गदर्शनासाठी धोनी एकटाच नाही, गंभीरने सुचवला नवा पर्याय

वाचा : क्रिकेटच्या इतिहासातील फक्त दुसराच सामना, रवी शास्त्रींनी कसोटी केली टाय!

VIDEO: पुण्यात बिबट्याची दहशत! पहाटेच्या सुमारास भरवस्तीत दिसला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 11:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...