मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : युझवेंद्र चहलचा गौप्यस्फोट, मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूची चौकशी होणार!

IPL 2022 : युझवेंद्र चहलचा गौप्यस्फोट, मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूची चौकशी होणार!

Yuzvendra Chahal

Yuzvendra Chahal

भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) त्याच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत गौप्यस्फोट केले, यानंतर आता मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) माजी खेळाडू अडचणीत सापडला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 11 एप्रिल : भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) त्याच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत गौप्यस्फोट केले, यानंतर आता मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) माजी खेळाडू अडचणीत सापडला आहे. इंग्लंडची क्रिकेट काऊंटी असलेला डरहम क्लब त्यांचा मुख्य प्रशिक्षक जेम्स फ्रॅन्कलीन (James Franklin) याची चौकशी करणार आहे. चहलने केलेल्या आरोपांबाबत फ्रॅन्कलीनसोबत वैयक्तिक बोलण्यात येईल, असं डरहम क्लबने सांगितलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला आरसीबीच्या (RCB) पॉडकास्टमध्ये चहलने 2011 साली घडलेली घटना सांगितली होती. चॅम्पियन्स लीगची फायनल जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्समधल्या फ्रॅन्कलीन आणि एण्ड्रयू सायमंड्स (Andrew Symonds) यांनी मला बांधून ठेवल्याचा आरोप चहलने केला होता.

'2011 साली घडलेल्या घटनेबाबत समोर आलेल्या वृत्ताबाबत आम्हाला माहिती मिळाली आहे. यात आमच्या कोचिंग स्टाफमधल्या सदस्याचं नाव आलं आहे. क्लबशी संबंधित असलेल्या गोष्टींचं तथ्य जाणून घेण्यासाठी आम्ही संबंधित व्यक्तींशी वैयक्तिक बोलू,' असं डरहम काऊंटी क्लबने इएसपीएन क्रिकइन्फोला सांगितलं.

तोंडाला टेप लावून बांधलं

सायमंड्स आणि फ्रॅन्कलीन यांनी आपल्या तोंडाला टेप बांधली आणि हात-पाय बांधून एका खोलीमध्ये बंद केलं, असा खळबळजनक आरोप चहलने आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये केला होता. फ्रॅन्कलीन 2011-2013 दरम्यान मुंबई इंडियन्समध्ये होता. 2019 च्या सुरूवातीला त्याची डरहमचा कोच म्हणून नियुक्ती झाली.

फ्रॅन्कलीन-सायमंड्स मद्यधुंद

'ही 2011 सालची घटना आहे, जेव्हा आम्ही चॅम्पियन्स लीग जिंकली होती. आम्ही चेन्नईमध्ये होतो. सायमंड्सने खूप जास्त फळांचा ज्यूस घेतला होता. ते काय विचार करत होते, मला माहिती नाही, पण त्याने आणि जेम्स फ्रॅन्कलीनने मिळून माझे हात-पाय बांधले. आता उघडून दाखवं असं ते म्हणाले. ते एवढे नशेत होते की त्यांनी माझ्या तोंडाला टेप चिटकवली आणि पूर्ण पार्टीमध्ये मला विसरून गेले.'

'फ्रॅन्कलीन आणि सायमंड्स तिकडून निघून गेले. सकाळी खोली साफ करायला आलेल्याने मला बघितलं. त्यानंतर त्याने काही लोकांना बोलावलं आणि माझे हात-पाय सोडण्यात आले. एवढा लाजिरवाणा प्रकार केल्यानंतरही दोन्ही क्रिकेटपटूंनी आपली माफी मागितली नाही, याची खंत आपल्याला आहे,' असं चहल म्हणाला होता.

2011 नंतर 2013 साली झालेल्या एका घटनेबाबतही चहल बोलला आहे. 2013 साली बँगलोरमध्ये झालेल्या आयपीएल मॅचनंतर मुंबईच्या खेळाडूने नशेमध्येच आपल्याला हॉटेलच्या 15 व्या मजल्यावरून खाली लटकवलं, असा गौप्यस्फोट चहलने केला. अश्विनसोबत बोलत असताना चहलने हे आरोप केले. चहलने या खेळाडूच्या नावाची घोषणा करावी, अशी मागणी भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने केली, तर रवी शास्त्री यांनी या खेळाडूवर कायमची बंदी घातली जावी, असं वक्तव्य केलं.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Yuzvendra Chahal