युवराजने सलग तीन षटकार मारताच चहलच्या डोळ्यासमोर दिसू लागला...

युवराजने सलग तीन षटकार मारताच चहलच्या डोळ्यासमोर दिसू लागला...

युवराज सिंगने सलग तीन षटकार मारल्यानंतर चौथ्या चेंडूवर तो बाद झाला.

  • Share this:

बेंगळुरू, 29 मार्च : आयपीएल 2019 मध्ये बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा फलंदाज युवराज सिंगने युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार खेचले. तेव्हा सर्वांनाच युवराज सिंग सलग सहा षटकार मारणार असे वाटत होते. त्यामुळे सर्वांनाच स्टुअर्ट ब्राॉडला मारलेल्या सहा षटकारांची आठवण झाली.

सलग तीन षटकार खेचल्यानंतर चौथ्या चेंडूवर युवराज उंच फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. मोहम्मद सिराजने सीमेवर त्याचा झेल घेतला. तीन षटकारानंतर युवराज बाद झाल्यावर चहलने सुटकेचा निश्वास टाकला.

युवराजने मारलेल्या षटकाराबद्दल सामना झाल्यावर चहलला विचारण्यात आले. तेव्हा चहल म्हणाला की, मला तर स्टुअर्ट ब्रॉड झाल्यासारखं वाटत होतं. युवराजने 2007 च्या टी20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात सहा षटकार मारले होते.

वाचा : कोहलीची तळपायाची आग मस्तकात, रोहित शर्मा म्हणाला...

दिग्गज फलंदाजाला गोलंदाजी करणं आव्हानात्मक होतं. मात्र माझ्या गोलंदाजीवर आणि क्षमतेवर माझा विश्वास होता. प्रत्येक चेंडू हा चांगलाच टाकायचा या विचाराने मी गोलंदाजी करत होतो. तरीही युवराजने तीन षटकार मारले. यासाठीच चौथ्या चेंडूवर वाइड गुगली टाकला आणि तो बाद झाला असं युझवेंद्र चहलने म्हटलं.

मुंबईने आरसीबीविरुद्धचा सामना सहा धावांनी जिंकला. या सामन्यात शेवटच्या चेंडूवर नो बॉल न दिल्याने अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.

First published: March 29, 2019, 3:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading