Abu Dhabi T10 League : पंजाबचा किंग युवराज सिंग झाला ‘मराठा’! या स्पर्धेत गाजवणार मैदान

Abu Dhabi T10 League : पंजाबचा किंग युवराज सिंग झाला ‘मराठा’! या स्पर्धेत गाजवणार मैदान

याचवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला युवराज सिंग आता झाला 'मराठा'.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : यावर्षी जूनमध्ये युवराज सिंगनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर युवराज कॅनडामध्ये झालेल्या ग्लोबल टी-20 लीगमध्ये खेळताना दिसला होता. आता युवराज सिंग आणखी एक स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.

अबुधाबीमध्ये होणाऱ्या टी-10 स्पर्धेत भारताचा माजी खेळाडू युवराज सिंग खेळणार आहे. या स्पर्धेत आयकॉन प्लेअर म्हणून दिसणार आहे. ही टी-10 लीग अबुधाबीमध्ये 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या लीगमध्ये युवराज मराठा होणार आहे. युवी या स्पर्धेत मराठा अरेबियन्स संघाकडू खेळताना दिसणआर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर दुसऱ्यांदा युवराज पुन्हा मैदानात उतरणार आहे.

टी-20 क्रिकेटबाबात युवराजनं, “हा फॉर्मेट नवीन आहे. या लीगमध्ये मोठ्या संघासोबत खेळण्याची संधी आणि मराठा अरेबियन्स संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली”, असे सांगितले. याआधी युवराज निवृत्ती घेतल्यानंतर कॅनडामध्ये झालेल्या ग्लोबल टी-20 लीगमध्ये खेळला होता.

वाचा-पुढच्या IPLमध्ये जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स सोडणार? ‘या’ फोटोमुळं खळबळ

वाचा-मॉलमध्ये पाणी विकताना दिसला विराट कोहली, पाहा काय आहे VIRAL VIDEO मागचं सत्य

गेल्या वर्षी सेमीफायनलपर्यंत पोहचला होता मराठा संघ

झिम्बाम्वेचा माजी क्रिकेटर अॅडी फ्लॉवर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर मराठा अरेबियन्स संघानं युवराजसोबत करार केला. गेल्या वर्षी टी-10 स्पर्धा शारजाहमध्ये खेळवण्यात आली होती. या स्पर्धेत मराठा अरेबियन्स संघानं सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती.

ड्वेन ब्राव्हो आहे संघाचा कर्णधार

वेस्ट इंडिजचा खेळाडू ड्वेन ब्राव्हो मराठा अरेबियन्स संघाचा कर्णधार असणार आहे. या संघाच दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगासह अफगाणिस्तानचे खेळाडूही असणार आहे. ऑस्ट्रेलियाता क्रिस लिनही या स्पर्धेत आयकॉन प्लेअर म्हणून खेळणार आहे.

वाचा-‘साधे बूट बांधता येत नाहीत आणि चालले धोनीची मापं काढायला’

युवराजनं बाहेरच्या स्पर्धांसाठी घेतली निवृत्ती

युवराजनं 10 जून 2019 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आपल्या 17 वर्षाच्या करिअरमध्ये युवीनं 304 एकदिवसीय, 58 टी-20 आणि 40 कसोटी सामने खेळले आहे. निवृत्ती घेतल्यानंतर युवराजनं जगभरातील वेगळ्या वेगळ्या स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला.

Published by: Priyanka Gawde
First published: October 26, 2019, 5:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading