धोनीच्या भविष्याबद्दल युवराज सिंगचा निवड समितीवर हल्लाबोल

धोनीच्या भविष्याबद्दल युवराज सिंगचा निवड समितीवर हल्लाबोल

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कपनंतर एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळलेला नाही. त्यामुळे धोनी निवृत्ती घेणार का अशी चर्चा रंगली आहे.

  • Share this:

मुंबई, 05 नोव्हेंबर : भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने म्हटलं की, देशातील अनेक क्रिकेटपटूंना त्यांच्या स्थान गमावण्याची भीती वाटते. तरीही थकल्यानंतर ते विश्रांती घेत नाही. आता सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्ष झाल्यानतंर यामध्ये बदल होईल असं म्हणाला. महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबद्दल सुरु असलेल्या चर्चेवर विचारले असता युवराज सिंगने निव़ड समितीवर टीका केली. तो म्हणा्ला की, याबद्दल आपल्या महान निवड समितीला विचारा.

युवराज सिंगने सांगितले की, ज्यावेळी विश्रांतीची गरज असते त्यावेळी थांबवं पाहिजे. अनेकदा खेळाडूंना दबावात खेळावं लागतं. जर नाही खेळलो तर आपल्याला बाहेर ठेवलं जाईल अशी भीती खेळाडूंना असते. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनं नुकतंच मानसिक स्वास्थ्य ठिक नसल्यानं विश्रांती घेतली आहे. आपले खेळाडू असं करू शकत नाहीत कारण त्यांना स्थान गमावण्याची भीती असते.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी गांगुली आल्यानंतर आता बदल होण्याची आशा आहे. यापुढे खेळा़डुंचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. प्रशासकांच्या नजरेतून क्रिकेट आणि खेळाडूंच्या नजरेतून क्रिकेटमध्ये फरक आहे. खेळाडूंच्या दृष्टीने विचार होईल असंही युवराज म्हणाला.

निवड समितीवर टीका करताना युवराजने म्हटलं की, आपल्याला चांगल्या निवडकर्त्यांची गजर आहे. निव़ड करणं हे काम सोपं नसतं. ज्यावेळी 15 खेळाडूंची निवड केली जाते तेव्हा त्या 15 खेळाडूंचे काय होणार ज्यांना संघात स्थान मिळवता आलं नाही.

वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या विजय शंकरला पुन्हा संघात स्थान मिळालेलं नाही. त्यावरूनही युवराजने जोरदार टीकास्र सोडले. तो म्हणाला की, मधेच विजय शंकर होता आणि आता नाही. तुम्ही त्याला खेळवता आणि बाहेर ठेवता. तुम्ही कसे खेळाडू तयार करणार? 3-4 डावात खेळाडू तयार होत नाहीत. खेळाडूंना जास्त वेळ द्यायला हवा असंही युवराज म्हणाला.

गडकरी-फडणवीस आमच्यासाठी एकच, संजय राऊतांच्या विधानाचा अर्थ काय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2019 10:13 AM IST

ताज्या बातम्या