Home /News /sport /

युवराज सिंगचा Liger शी पंगा, अशी झाली सिक्सर किंगची अवस्था, पाहा VIDEO

युवराज सिंगचा Liger शी पंगा, अशी झाली सिक्सर किंगची अवस्था, पाहा VIDEO

युवराज सिंगने (Yuvraj Singh) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी त्याची लोकप्रियता काही कमी झाली नाही. असाच एक व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. यामध्ये तो पिंजऱ्यामध्ये बंद असलेल्या लायगरसोबत (Yuvraj Singh with Liger) दोन हात करत आहे. हा व्हिडिओ दुबई फेम पार्कमधला (Dubai Fame Park) आहे.

पुढे वाचा ...
  दुबई, 3 ऑक्टोबर : युवराज सिंगने (Yuvraj Singh) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी त्याची लोकप्रियता काही कमी झाली नाही. अजूनही चाहत्यांना युवराजच्या फटकेबाजीची आठवण येते. युवराजदेखील त्याच्या चाहत्यांना निराश करत नाही. सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ टाकून युवी त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन करतो. असाच एक व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. यामध्ये तो पिंजऱ्यामध्ये बंद असलेल्या लायगरसोबत (Yuvraj Singh with Liger) दोन हात करत आहे. हा व्हिडिओ दुबई फेम पार्कमधला (Dubai Fame Park) आहे. या व्हिडिओमध्ये युवराज लायगरसोबत 'टग ऑफ वार' म्हणजेच रस्सीखेच करत आहे. एका बाजूला पिंजऱ्यात बंद असलेला लायगर आपल्या तोंडात रस्सी घेऊन आहे, तर दुसऱ्या बाजूला युवराज आणि त्याचे साथीदार ही रस्सी ओढत आहेत. भरपूर प्रयत्नांनंतर युवराजने माघार घेतली आणि रस्सी सोडून दिली. युवराज जरी या लढाईमध्ये हरला, तरी चाहत्यांना मात्र त्याचा हा व्हिडिओ आवडला आहे. लायगर नर सिंह आणि वाघिण यांच्या मिलनाने जन्म घेतो, त्यामुळे त्याला लायगर म्हणलं जातं.
  युवराजने हा व्हिडिओ मजेदार कॅप्शनसह शेयर केला आहे. Tiger vs Liger आणि हो निकाल तुम्हाला निश्चितच माहिती आहे, असं कॅप्शन युवराजने या व्हिडिओला दिलं आहे. युवराज सध्या युएईमध्ये आहे आणि त्याने दुबईच्या फेम पार्कमध्ये फेरफटका मारला. इन्स्टाग्रामवर त्याने लायगरसोबतच्या सामन्याचा 4 मिनिटांचा व्हिडिओ शेयर केला. या व्हिडिओमध्ये तो अस्वल आणि माकडांना खाणं देतानाही दिसत आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे. फेम पार्क एक सुरक्षित आश्रय स्थळ आहे जिकडे जनावरांची पूर्णपणे काळजी घेतली जाते आणि त्यांना एका सुरक्षित वातावरणात ठेवलं जातं. प्राण्यांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी आहेत. या पार्कमध्ये कोणत्याही जनावरांना त्रास दिला जात नाही, असं युवराज म्हणाला. युवराज सिंग सोशल मीडियावर बराच ऍक्टिव्ह असतो. काहीच दिवसांपूर्वी त्याने एक व्हिडिओ शेयर केला होता, ज्यात त्याने स्टुअर्ट ब्रॉडला 2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये 6 बॉलला 6 सिक्स मारले होते. हा व्हिडिओदेखील त्याच्या चाहत्यांना पसंत पडला होता. 6,6,6,6,6,6 युवराज सिंहनं सांगितला 14 वर्षांपूर्वीचा इतिहास, 'त्या'आठवणी झाल्या जिवंत! पाहा VIDEO
  Published by:Shreyas
  First published:

  Tags: Yuvraj singh

  पुढील बातम्या