Home /News /sport /

Yuvraj Singh ला नक्की झालय तरी काय? VIDEO पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

Yuvraj Singh ला नक्की झालय तरी काय? VIDEO पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

Yuvraj Singh

Yuvraj Singh

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह(Yuvraj Singh ) सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

  नवी दिल्ली, 30 जानेवारी: नुकतंच भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह(Yuvraj Singh ) त्याच्या घरी गोंडस पाहुण्याचं आगमन झाल्याने चर्चेत आहे. युवराज ट्विट करत ही गोड बातमी आपल्या चाहत्यांनी दिली होती. युवराज नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतो. काही ना काही तरी शेअर करत असतो. आताही त्याने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. तो पाहून युवराजला नक्की झालयं तरी काय? असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित होत आहे. युवराज सिंहने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एका फिल्टरच्या साहय्याने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. विचित्र फिल्टरचा वापर केल्याने त्या व्हिडीओमध्ये युवीचा चेहरा वाकडा तिकडा दिसत आहे. इतकेच नव्हे तर “किन्ना सोणा तैनूं रब ने बनाया” हे गाणं गुणगुणताना दिसत आहे. आणि मध्येच घाणेरडे तोंड घेऊन इथून पळून जा असे स्वतःलाच म्हणतो अन् हसू लागतो.
  त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहते मजेशीर कमेंट्स सह लाईक्सचा वर्षाव करत आहेत. इंस्‍टाग्रामवर हा फिल्टर आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे. अनेक युजर्स त्याच्या साहय्याने रिल्स बनवताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी, बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीच आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह आई-वडील झाले आहेत. हेजलने 25 जानेवारीला मुलाला जन्म दिला. खुद्द युवराजने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. युवराजने "आम्ही खूप आनंदी आहोत, आशा आहे की तुम्ही आमच्या प्रायव्हसीचा आदर कराल." असे कॅप्शनमध्ये म्हटले.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Instagram, Instagram post, Yuvraj singh

  पुढील बातम्या