मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

VIDEO : ‘कब्र बनेगी तेरी’, जेव्हा ख्रिस गेल फिल्मी बोलतो तेव्हा काय होतं पाहा

VIDEO : ‘कब्र बनेगी तेरी’, जेव्हा ख्रिस गेल फिल्मी बोलतो तेव्हा काय होतं पाहा

हिंदी डायलॉग बोलताना लागली गेलची वाट, युवीने शेअर केला मजेदार VIDEO

हिंदी डायलॉग बोलताना लागली गेलची वाट, युवीने शेअर केला मजेदार VIDEO

हिंदी डायलॉग बोलताना लागली गेलची वाट, युवीने शेअर केला मजेदार VIDEO

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 15 मार्च : कोरोना व्हायरसमुळे सर्व खेळाडू सध्या मैदानापासून दूर आहेत. कोरोनामुळे जवळजवळ सर्व क्रिकेट सामने रद्द झाले आहेत. एकीकडे कोरोनामुळे सगळे चिंतेत असताना भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणि वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल मजा करताना दिसत आहेत.

युवराजने ख्रिस गेलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात कॅरिबियन फलंदाज हिंदी डायलॉग बोलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र गेलला या डायलॉग नीट बोलता येत नाही आहे. हा मजेशीर व्हिडीओ युवीने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर युवीने कॉन्फिडेंस मेरा, खबर बनेगी तेरी. अच्छा कहा काका!, असे कॅप्शन दिले आहे.

वाचा-ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूने भारतीय तरुणीसोबत दुसऱ्यांदा केला साखरपुडा

 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 

Confidence meraaaa ! Kabar banegi teri !! Well said kaka @chrisgayle333

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial) on

वाचा-कोरोनाच्या भीतीने धोनीने सोडली चेन्नई सुपर किंग्जची साथ, CSKने शेअर केला VIDEO

युवराज सिंग नुकताच रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये इंडिया लेजेंड संघाचा सदस्य होता, परंतु कोरोनामुळे ही मालिका पुढे ढकलण्यात आली. त्याचवेळी, ख्रिस गेल नेपाळच्या एव्हरेस्ट प्रीमिअर लीगमध्ये खेळणार होता, मात्र ही स्पर्धाही कोरोनामुळे रद्द झाली. क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आयपीएलकडे होते. मात्र कोरोनामुळे 29 मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. आयपीएलमध्ये गेल किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळतो.

First published:

Tags: Chris gayle, Cricket, Yuvraj singh