Home /News /sport /

7 वर्ष 12 वा खेळाडू राहिलो, पण... युवराजने सांगितलं पुढच्या जन्मी काय करायचंय

7 वर्ष 12 वा खेळाडू राहिलो, पण... युवराजने सांगितलं पुढच्या जन्मी काय करायचंय

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) भारतासाठी 17 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला, पण टेस्ट क्रिकेटमध्ये (Test Cricket) त्याला फार संधी मिळाली नाही. याबाबत निवृत्तीनंतर वारंवार युवराजने दु:ख बोलून दाखवलं.

    मुंबई, 22 मे : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) भारतासाठी 17 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला, पण टेस्ट क्रिकेटमध्ये (Test Cricket) त्याला फार संधी मिळाली नाही. याबाबत निवृत्तीनंतर वारंवार युवराजने दु:ख बोलून दाखवलं. आता सोशल मीडियावरही युवराजने त्याची खंत व्यक्त केली आहे. भारताला 2011 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या युवराजला फक्त 40 टेस्ट खेळायला मिळाल्या. 7 वर्ष मी टेस्ट टीममध्ये 12 वा खेळाडू म्हणून राहिलो, असं युवराज म्हणाला. विसडन इंडियाने युवराज सिंगचा फोटो शेयर करत चाहत्यांना प्रश्न विचारला, की त्या खेळाडूचं नाव सांगा जो जास्त टेस्ट खेळू शकला नाही. या प्रश्नावर युवराज सिंगनेही उत्तर दिलं. कदाचित पुढच्या जन्मी मी 7 वर्ष 12 वा खेळाडू बनणार नाही, असं युवराज म्हणाला. 39 वर्षांच्या युवराजने आपल्या करियरमध्ये 304 वनडे आणि 58 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या. त्याच्या नावावर वनडेमध्ये 8,701 रन आणि 111 विकेट तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 1,177 रन आणि 28 विकेट आहेत. yuvraj singh on test career 2000 साली युवराजने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, पण टेस्ट टीममध्ये स्थान मिळवायला त्याला जवळपास तीन वर्ष लागली. 2003 साली न्यूझीलंडविरुद्ध युवराज मोहालीमध्ये पहिली टेस्ट खेळला. 2012 साली तो शेवटची टेस्ट खेळला, या 9 वर्षात त्याला फक्त 40 टेस्ट खेळण्याचीच संधी मिळाली होती. टेस्ट करियरमध्ये युवराजने 1900 रन आणि 9 विकेट घेतल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Yuvraj singh

    पुढील बातम्या