सिक्सर किंग युवराजच्या कारकिर्दीला पूर्णविराम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

सिक्सर किंग युवराजच्या कारकिर्दीला पूर्णविराम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

युवराज सिंगनं जून 2017नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

  • Share this:

मुंबई, 10 जून : टी-20 वर्ल्ड कप 2007 आणि 2011 आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारताला चॅम्पियन बनवणारा 'सिक्सर किंग' युवराज सिंगनं चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. सध्या भारतीय संघ ICC Cricket World Cupमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. यातच आता भारताला तब्बल 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या युवराज सिंगनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आज साऊथ मुंबईच्या एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत युवराज सिंगनं ही माहिती दिली.

भारतातील सर्वोत्कृष्ठ एकदिवसीय क्रिकेटपटूपैकी एक असलेल्या युवराज सिंग हा आजही सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो. 2007च्या टी-20 क्रिकेटमध्ये त्यांनी इंग्लंडविरोधात स्टुअर्ट ब्रॉड याला सहा चेंडूत सहा षटकार मारले होते. त्यानंतर 2011च्या वर्ल्ड कपमध्ये रक्ताच्य उलट्या होत असूनही युवराजनं माघार घेतली नाही. या वर्ल्ड कपचा तो, मालिकावीर ठरला. त्यानंतर युवराज सिंगला रक्ताचा कर्करोग झाल्यामुळं तो काही काळ क्रिकेटपासून लांब होता.त्यामुळं एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये युवीनं 2000 साली पदार्पण केले होते ते. मात्र, जून 2017नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. युवराजकडे 304 एकदिवसीय सामने, 40 कसोटी आणि 58 टी-20 सामने खेळले आहेत.

यंदाच्या आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई संघाकडून खेळणाऱ्या युवराज सिंगला विशेष चांगली कामगिरी करता आलेली नाही. यासंदर्भात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहेत. निवृत्ती घेतल्यानंतर युवराज सिंग विदेशी टी-20 लीगमध्ये करिअर करण्याच्या विचारात आहे.

वाचा-World Cup : मैदान तर जिंकलं, पण चाहत्यांच्या 'या' कृतीमुळे विराटनं मागितली स्मिथची माफी

वाचा- Point Table : विराटसेनेची विजयी घौडदौड, पण गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर 'हा' संघ

वाचा-20 साल बाद... ओव्हलवर त्या खेळीची आठवण पुन्हा ताजी

VIDEO विधानसभा निवडणुकीची तयारी आजपासून सुरू - मुख्यमंत्री

First published: June 10, 2019, 1:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading