IPL 2019 : गेल्या दहा हंगामात युवराजचा हा विक्रम कोणालाही मोडता आला नाही

IPL 2019 ला शनिवारपासून सुरुवात होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 09:59 AM IST

IPL 2019 : गेल्या दहा हंगामात युवराजचा हा विक्रम कोणालाही मोडता आला नाही

आयपीएलच्या 12 व्या हंगामाला उद्यापासून सुरूवात होत आहे. अनेक सुपरहीट खेळाडू नव्या जर्सीसह आणि नव्या संघातून खेळताना दिसतील. तर काही खेळाडू पुन्हा आपल्या जुन्या संघाकडून खेळतील.

आतापर्यंत अनेक बदल आणि रेकॉर्ड आयपीएलमध्ये झाले पण एक असा विक्रम जो दुसऱ्या हंगामात झाला तो आजही अबाधित आहे. विशेष म्हणजे तो भारतीय खेळाडूच्या नावावर आहे.

युवराज सिंगने आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात म्हणजेच 2009 मध्ये फलंदाजीसोबतच गोलंदाजीसुद्धा जबरदस्त केली होती. युवराजने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळताना दुसऱ्या हंगामात दोनवेळा हॅट्ट्रिक करण्याचा विक्रम केला आहे. आतापर्यंत कोणत्याच खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही.

Loading...

युवराज सिंगने 2009 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूविरुद्ध खेळताना सलग तीन चेंडूवर रॉबिन उथप्पा, जॅक कॅलिस आणि मार्क बाऊचरला बाद केले होते. तर डेक्कन चार्जर्सविरुद्ध खेळताना हर्शल गिब्ज, अँड्र्यु सायमंडस आणि वेणुगोपाल राव यांना सलग तीन चेंडूवर बाद केलं होतं.

आयपीएलमध्ये आतापर्यंत 17 गोलंदाजांनी हॅटट्रिक केली आहे. यात 12 गोलंदाजांनी एकवेळा हॅट्ट्रिक केली आहे. अमित मिश्राने सर्वाधिक तीनवेळा तर युवराज सिंगने दोनवेळा हॅट्ट्रिक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 09:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...