पुन्हा दिसणार सिक्सर किंगची कमाल! निवृत्तीनंतर होणार 'या' संघाचा कर्णधार

पुन्हा दिसणार सिक्सर किंगची कमाल! निवृत्तीनंतर होणार 'या' संघाचा कर्णधार

कॅनडानंतर आता या देशात युवराज खेळणार क्रिकेट.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : भारताचा माजी फलंदाज आणि सिक्सर किंग युवराज सिंगनं क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर युवराज भारताबाहेर क्रिकेट स्पर्धांमध्ये सक्रिय आहे. याआधी युवराज ग्लोबल टी-20 लीगमध्ये खेळताना दिसला होता. आता युवराज अबुधाबीमध्ये होणाऱ्या टी-10 लीगमध्ये खेळणार आहे.

भारताला टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये चॅम्पियन बनवणारा युवराजला टीम इंडियात खेळण्याच्या संधी मिळाल्या नाहीत. त्याचबरोबर आयपीएलमध्येही जास्त सामने खेळता आले नाहीत. दरम्यान क्रिकेट नेक्स्टनं दिलेल्या बातमीनुसार, निवृत्ती घेतलेला युवराज सिंग टी-20 लीगमध्ये खेळणार आहे. टी-10 लीगचे चेअरमॅन शाजी उल-मुल्क यांनी याबाबत माहिती दिली.

वाचा-पाकिस्तानची नवी खेळी, सरफराजला हटवत त्यांच्या ‘विराट’ला दिलं कर्णधारपद

टी-20नंतर आता युवी खेळणार टी-10 क्रिकेट

टी-10 लीगमध्ये खेळण्यासाठी युवराजची जवळजवळ निवड झाली आहे. त्यासाठी युवीनंही संमती दर्शवली आहे. याबाबत शाजी-उल-मुल्क यांनी, “युवराज सिंग काही दिवसांत येथे येईल. त्यामुळं लवकरच आम्ही याबाबत घोषणा करू. युवीसोबत गोष्टी अंतिम टप्प्यात आल्या आहेत.बीसीसीआयच्या नियमानुसार निवृत्ती घेतलेले खेळाडू भारताबाहेर स्पर्धा खेळू शकतात. युवराज सिंगने जुलैमध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर कॅनडामध्ये झालेल्या ग्लोबल टी-20 स्पर्धेत तो खेळला होता. या लीगमध्ये युवराजनं शानदार प्रदर्शन करत 38.25च्या सरासरीनं 153 धावा केल्या होत्या.

वाचा-भारताविरुद्ध बांगलादेशचा संघ जाहीर, तुरुंगात गेलेल्या खेळाडूला दिली संधी

टी-10मध्ये मोठ्या नावांचा समावेश

टी-10 क्रिकेटमध्ये मोठ्या दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार इयॉन मार्गन, पाकिस्तानचा जलद गोलंदाज मोहम्मद आमिर, लसिथ मलिंगा, मोईन अली, डॅरेन सॅमी, ऑंद्र रसेल यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

वाचा-IPLच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अजब घटना, विराटच्या संघात ‘महिलाराज’

'चंपा'वर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, राज ठाकरे यांना म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2019 04:54 PM IST

ताज्या बातम्या