• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Yuvraj Singhचे फॅन्ससाठी दिवाळी गिफ्ट; मैदानात पुन्हा षटकारांची बरसात पाहायला मिळणार

Yuvraj Singhचे फॅन्ससाठी दिवाळी गिफ्ट; मैदानात पुन्हा षटकारांची बरसात पाहायला मिळणार

Yuvraj Singh

Yuvraj Singh

सिक्सर किंगच्या (Yuvraj Singh) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मैदानात पुन्हा षटकारांची बरसात पाहायला मिळणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : क्रिकेट जगतात सध्या टी 20 वर्ल्ड कपचे (T20 World Cup) वारे वाहू लागले आहे. सर्वांचे लक्ष टी 20 वर्ल्ड कपकडे असले तरी एकीकडे क्रिकेटप्रेमी दिवाळीची धुमधामध्ये व्यस्त आहेत. अशातच क्रिकेट जगतातून मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh Makes Stunning Comeback Announcement) पुन्हा मैदानात उतरणार आहे. हे खुद्द युवराज सिंगने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना त्याने मोठे दिवाळी गिफ्ट दिले आहे. युवराज सिंगने नुकतचं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने चाहत्यांच्या मागणी लक्षात घेऊन पुन्हा पीचवर उतरण्याचा निर्णय घेत असल्याचं सांगितले आहे. आपण कधी मैदानात उतरणार तेदेखील युवराजनं पोस्टमध्ये नमूद केलं आहे. मात्र त्यानं कोणत्या मालिकेत किंवा सामन्यात खेळणार त्याबद्दल माहिती दिलेली नाही.

  इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय म्हटले आहे युवीने?

  देव तुमचं नशीब लिहित असतो. लोकांची मागणी लक्षात घेता मी फेब्रुवारीत क्रिकेटच्या मैदानात परतेन अशी आशा आहे. यापेक्षा छान भावना असूच शकत नाही. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आभार. या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आमच्या संघाला पाठिंबा देत राहा. कारण एक खरा चाहता अवघड काळात संघाची साथ सोडत नाही. जय हिंद!', असं युवराजने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. पुढील वर्षी होणार्‍या सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग व्यतिरिक्त इतर खेळाडूंप्रमाणेच युवीदेखील रोड सेफ्टी सीरीज खेळेल, असे मानले जात आहे. युवराज सिंगने 2019 मध्ये क्रिकेटला अलविदा केले होता. त्यानंतर तो ग्लोबल कॅनडा टी20 लीग आणि रोड सेफ्टी सीरिजमध्ये खेळताना दिसला आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: