भारताचा चॅम्पियन युवराज करणार क्रिकेटला गुडबाय? आज घेऊ शकतो निर्णय

युवराज सिंगनं जून 2017नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

News18 Lokmat | Updated On: Jun 10, 2019 09:52 AM IST

भारताचा चॅम्पियन युवराज करणार क्रिकेटला गुडबाय? आज घेऊ शकतो निर्णय

मुंबई, 10 जून : 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारताला चॅम्पियन बनवणारा सिंग इज किंग युवराज सिंग चाहत्यांना मोठा धक्का देऊ शकतो. सध्या भारतीय संघ ICC Cricket World Cupमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. यातच आता भारताला तब्बल 28 वर्षांनी वर्ल्ड कर जिंकून देणारा युवराज सिंग निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. युवराजनं आज साऊथ मुंबईच्या एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद बोलावली आहे. यात जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.

भारतातील सर्वोत्कृष्ठ एकदिवसीय क्रिकेटपटूपैकी एक असलेल्या युवराज सिंग हा आजही सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो. 2007च्या टी-20 क्रिकेटमध्ये त्यांनी इंग्लंडविरोधात स्टुअर्ट ब्रॉड याला सहा चेंडूत सहा षटकार मारले होते. त्यानंतर 2011च्या वर्ल्ड कपमध्ये रक्ताच्य उलट्या होत असूनही युवराजनं माघार घेतली नाही. या वर्ल्ड कपचा तो, मालिकावीर ठरला. त्यानंतर युवराज सिंगला रक्ताचा कर्करोग झाल्यामुळं तो काही काळ क्रिकेटपासून लांब होता. त्यानंतर त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही.

2000 साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या युवराज सिंगनं जून 2017नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. युवराजकडे 304 एकदिवसीय सामने, 40 कसोटी आणि 58 टी-20 सामने खेळले आहेत.

यंदाच्या आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई संघाकडून खेळणाऱ्या युवराज सिंगला विशेष चांगली कामगिरी करता आलेली नाही. यासंदर्भात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहेत. निवृत्ती घेतल्यानंतर युवराज सिंग विदेशी टी-20 लीगमध्ये करिअर करण्याच्या विचारात आहे.

वाचा-World Cup : मैदान तर जिंकलं, पण चाहत्यांच्या 'या' कृतीमुळे विराटनं मागितली स्मिथची माफी

Loading...

वाचा- Point Table : विराटसेनेची विजयी घौडदौड, पण गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर 'हा' संघ

वाचा-20 साल बाद... ओव्हलवर त्या खेळीची आठवण पुन्हा ताजी


VIDEO विधानसभा निवडणुकीची तयारी आजपासून सुरू - मुख्यमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2019 09:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...