IPLAuction2019 : युवी इज बॅक, 'मुंबई'ने दिला आधार!

भारतीय टीममधून बाहेर राहिलेला युवराज सिंगची आता पंजाब इलेव्हननेही साथ सोडली. पण मुंबईने युवराजचा आधार देत आयपीएलमधलं त्याचं करिअर कायम ठेवलं.

  • Share this:

आयपीएलच्या 12 व्या हंगामासाठी लिलाव सुरू आहे. यावेळी युवराज सिंगवर पहिल्या राऊंडमध्ये कुणीही बोली लावली नाही. त्यामुळे त्याचं क्रिकेट करिअर संपलं आहे का, असा प्रश्न निर्माण झाला होता. पण अखेरच्या क्षणात मुंबई इंडियन्सने युवराजला आधार दिला.

मागच्या हंगामामध्ये युवराज हा किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत होता. त्यावेळी त्याच्यावर 2 कोटींची बोली लावून त्याला खरेदी केलं होतं.

युवराजने आयपीएलमध्ये आतापर्यंत 128 सामने खेळले. त्यात त्याने 2652 धावा केल्यात. मागील आयपीएलच्या हंगामात युवराजचा परफॉर्मन्स चांगला नव्हता. त्यामुळे यावेळी त्याच्यावर पहिल्या राऊंडमध्ये बोली न लागण्याची नामुष्की आली.

आयपीएलमध्ये बोली न लागल्यामुळे युवराजच्या करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण अखेरीस मुंबई इंडियन्सने युवराजला 1 कोटींमध्ये खरेदी करून आधार दिला.

बऱ्याच दिवसांपासून युवराज भारतीय संघातून बाहेर आहे. त्याचा मागच्या वर्षीचा आयपीएल संघ असलेल्या किंग्ज इलेव्हननेही त्याला यावेळी रिटेन केलं नाही.

या हंगामामध्ये युवराज सिंगची बेस प्राईज 1 कोटी होती. पण त्याच्याच संघाने त्याला खरेदी करण्यास रस दाखवला नाही.

तर दुसीकडे अक्षर पटेल आणि कोर्लोस ब्रेथवेटवर 5 कोटींची बोली लागली.

यावेळी एक खेळाडू असाही आहे, ज्याच्यावर 8.40 कोटींची बोली लागूनही तो खेळाडू तोट्यात राहिला आहे.

हा क्रिकेटर आहे जयदेव उनाडकट. या जलदगती गोलंदाजाला त्याची जुनी टीम असलेल्या राजस्थान रॉयल्सनेच ही मोठी बोली लावून खरेदी केलं आहे.

8. 40 कोटींची कमाई करूनही उनाडकट गेल्या वर्षीच्या तुलनेत तोट्यात राहिला. मागच्या सीझनमध्ये जयदेव उनाडकटवर 11.5 कोटी बोली लागली होती.

मागच्या सीझनमध्ये मोठी बोली लागलेल्या उनाडकटची कामगिरी तितकीशी समाधानकारक राहिली नव्हती. त्यामुळे राजस्थानने त्याला रिलीज केलं.

जयदेवची बेस प्राईज 1.5 इतकी होती. त्याला पाचपट अधिक रक्कम देऊन पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सने खरेदी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 08:42 PM IST

ताज्या बातम्या