उद्धव ठाकरेंबद्दलच्या एका TWEET मुळे युवराज झाला ट्रोल; काय आहे युवराज ट्रोलिंगचं उद्धव ठाकरे कनेक्शन?

उद्धव ठाकरेंबद्दलच्या एका TWEET मुळे युवराज झाला ट्रोल; काय आहे युवराज ट्रोलिंगचं उद्धव ठाकरे कनेक्शन?

युवराज सिंहने बुधवारी संध्याकाळी एक TWEET केलं आणि काही मिनिटातच यूजर्सनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. उद्धव ठाकरेंसंबंधीचं हे कुठलं ट्वीट होतं पाहा...

  • Share this:

मुंबई, 4 डिसेंबर : युवराज सिंहने बुधवारी संध्याकाळी एक TWEET केलं आणि काही मिनिटातच यूजर्सनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. महाराष्ट्रात झालेल्या सत्तापालटाबद्दलचं त्याचं ट्वीट एवढ्या उशीरा आलं आणि सोशल मीडियावर युवराजची यथेच्छ खिल्ली उडवली गेली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले, त्याला आता जवळपास आठवडा होत आला आणि आत्ता युवराजने या राजकीय घडामोडीची दखल घेत एक साधंसं ट्वीट केलं.

"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल उद्धव ठाकरेजी यांंचं अभिनंदन! त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगती करेल अशी आशा आहे." अशा अर्थाचं ट्वीट युवराज सिंहने बुधवारी 4 डिसेंबरला संध्याकाळी 7.15 वाजता केलं. त्यावर यूजर्सनी राजकीय प्रतिक्रिया दिल्याच, पण हे ट्वीट आत्ता एवढ्या उशीरा युवराजनं का केलं असावं याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

अनेक ट्वीटर यूजर्सनी युवराजला फारच लवकर जाग आली, असं म्हणत त्याला ट्रोल केलं. हे ट्वीट वाचल्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया काय असेल, असंही एका twitter यूजरनं विचारलं.

अनेक अॅनिमेटेड प्रतिक्रियांचा पाऊस यावर पडला.

इसको अभी पता चला? असं म्हणत अनेकांनी युवराजची खिल्ली उडवली.

अन्य बातम्या

निवडणूक निकालानंतर भाजपने पहिल्यांदाच केला शरद पवारांवर हल्लाबोल!

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या मतभेदांवर एकनाथ शिंदेंचा खुलासा

अमृता फडणवीस सरकारी बैठकांना राहायच्या उपस्थित? भाजपने केला खुलासा

सिंगर धोनी तुम्ही पाहिलात का? सोशल मीडियावर VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2019 08:06 PM IST

ताज्या बातम्या