रायपूर, 17 मार्च: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगने (Yuvraj Singh) काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती (Retire From international cricket) घेतली आहे. पण नुकत्याच जयपूर याठिकाणी सुरू असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये (Road Safety World series 2021) भारतीय खेळाडूंचा जलवा कायम आहे.
युवराजने या मालिकेच्या पहिल्या सेमीफायनल (1st semi final) सामन्यात प्रतिस्पर्धी संघाची जोरदार धुलाई केली आहे. युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकर यांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर इंडियन लेजंड्सने वेस्ट इंडिज लेजंड्ससमोर 219 धावांचं भरभक्कम लक्ष्य ठेवलं. (indian legends vs West Indies legends)
यावेळी युवराज सिंगने वेस्ट इंडिज संघाच्या महेंद्र नगामूटू या बॉलरच्या एकाच ओव्हरमध्ये चार सिक्स (4 Six in single over)लगावले आहेत. या खेळीची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. युवराजने मैदान सोडलं असलं तरी खेळणं विसरला नाही, हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. यावेळी युवराजने अवघ्या 20 बॉलमध्ये नाबाद 49 धावांची आतिषी खेळी खेळली आहे. दरम्यान त्याने 1 चौकार आणि 6 उत्तुंग सिक्स लगावले आहे. त्याच्या या खेळीने युवराजने पुन्हा एकदा त्याचा जुना जलवा दाखवला आहे.
Yuvraj Singh all sixes against West Indies Legend Beast mode @YUVSTRONG12 pic.twitter.com/xBv5SdQTSj
— . (@_pilloyal) March 17, 2021
यावेळी चौथ्या विकेटसाठी युवराजने युसुफ पठाणच्या मदतीने 35 बॉलमध्ये 78 धावांची भक्कम पार्टनरशिप केली आहे. युसुफ पठाणने आपल्या संघासाठी योगदान देताना, 20 बॉलमध्ये 37 धावांची खेळी केली आहे. यावेळी त्याने दोन चौकार आणि तीन सिक्स देखील लगावले आहे. एवढंच नव्हे तर, युवराजने याच टुर्नामेंटमध्ये गेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या जानडेर डि ब्रुनला एकाच ओव्हरमध्ये चार सिक्स लगावले आहेत.
हे ही वाचा -जबरदस्त! मुंबईने फक्त 4 बॉलमध्ये जिंकली वन-डे मॅच
खरंतर युवराजने या दोन्ही धमाकेदार खेळी साकारून 2007 च्या वर्ल्डकपची आठवण करून दिली आहे. 2007 च्या टी -20 वर्ल्डकपमध्ये युवराजने इंग्लडविरुद्धच्या सामन्यात बॉलर स्टुअर्ट ब्रॉडला एकाच ओव्हरमध्ये तब्बल सहा सिक्स लगावले होते. या ऐतिहासिक खेळीने भारताला तर विजय मिळवून दिला सोबतच विश्वकप जिंकण्यासही मदत झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news